मंचर| कळंब येथे पिकअपची दुचाकीला धडक
Updated On:

मंचर,(प्रतिनिधी) – कळंब (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर पिकप गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत जुन्नर तालुक्यातील दोघेजण जखमी झाले आहेत.
या अपघात प्रकरणी पिकअप चालक सागर बाळासाहेब भोजणे (रा. जारकरवाडी, ता. आंबेगाव)वर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर गंगाराम गाढवे (वय 48), ज्ञानेश्वर बाळासाहेब रसाळ (दोघे रा. ओतूर, ता. जुन्नर) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. पुढील तपास मंचरचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र हिले करत आहे.





