Manchar Crime – आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. कौटुंबिक वादातून आईनेच टोकाचे पाऊल उचलत मुलीला घरातच जीवे मारण्याच्या उद्देशाने तिला वायरीच्या सहाय्याने गळा आवळून मृत झाली असे समजून घराला कुलूप लावून स्वतःच्या मुलांसह विहिरीत उडी मारली. त्यामध्ये सहा वर्षांचा निरागस मुलगा निहांतचा मृत्यू झाला. तर त्याची आई हर्षदा आशिष बाणखेले (वय ३५, रा. मंचर ता.आंबेगाव) या थोडक्यात बचावल्या. ही धक्कादायक घटना शुक्रवार, दि.३ रोजी उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास (मंचर ता.आंबेगाव) येथील लालबाग प्रेस्टीज येथे प्रॉपर्टीच्या कौटुंबिक कारणावरून सुरू असलेल्या वादातून संतापाच्या भरात आईने प्रथम १३ वर्षीय मुलगी परीज्ञावर घरातच जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. गळा आवळून व मारहाण करून ती मृत झाल्याचे समजून तिला घरातच बंद करून ठेवण्यात आले. त्यानंतर सहा वर्षांचा निरागस मुलगा निहांत याला दुचाकीवर सोबत घेऊन ती तपनेश्वर मंदिराजवळील विहिरीकडे गेली. तिथे स्वतःसह मुलाला विहिरीत उडी मारत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या दुर्दैवी घटनेत चिमुकल्या निहांतचा मृत्यू झाला, तर आई विहिरीत थोडक्यात वाचली. विहिरीत उडी मारताना स्थानिक नागरिकांनी पाहिले.त्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा करून विहीर बाहेर दोघांना काढले असता त्यामध्ये निहांतचा मृत्यू झाला. तर त्यांची आई जखमी झाली.त्यानंतर घरातच मुलगी परीज्ञा ही गंभीर जखमी अवस्थेत सापडली. मुलगा निहांत याचा जीव घेण्याच्या उद्देशाने स्वतः विहीरीत उडी मारली. माझी पत्नी हर्षदा आशिष बाणखेले वय 35 हिच्या विरूध्द कायदेशिर तक्रार पती आशिष बाणखेले यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.या घटनेमुळे मंचर परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत असून, एका आईच्या अशा टोकाच्या निर्णयाने समाजमन हेलावून गेले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.