पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात…

Ganeshotsav Festival 2024 | यंदाचा गणेश चतुर्थीचा सण आज (शनिवार ७ सप्टेंबर) पासून सुरु होत आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू झाली आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांकडून जल्लोषात बाप्पांची मिरवणूक काढून त्यांचं स्वागत केलं जात आहे.
पुण्यातील मानाच्या आणि महत्त्वाच्या गणपतींची ख्याती जगभर आहे, त्यामुळे हा सोहळा पाहण्यासाठी केवळ राज्यातून नव्हे तर राज्याच्या बाहेरून अगदी परदेशातूनही अनेक भाविक, पर्यटक पुण्यात येतात. नुकतेच पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या मिरवणूकीला सुरुवात झाली आहे. Ganeshotsav Festival 2024 |
रास्ता पेठेतून गणेश मूर्ती पारंपरिक चांदीच्या पालखीत विराजमान करण्यात आली आहे. मिरवणुकीत सनई चौघडा, बँड पथक, ढोल ताशा पथक सहभागी झाले आहेत. मिरवणुकीनंतर अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र सिद्धटेक देवस्थानच्या प्रतिकात्मक मंदिरात श्री कसबा गणपती विराजमान होणार आहेत. ११:४५ वाजता कोल्हापूर येथील श्री सिद्धगिरी मठाचे मठाधिपती आणि विश्वस्थ अदृश्य कांड सिद्धरश्वर यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. Ganeshotsav Festival 2024 |
दरम्यान, आपल्या देशातील प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि जेव्हा गणेश चतुर्थीनिमित्त गणरायाचे आगमन होते, तेव्हा तर सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. १० दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपती बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा आणि आराधना केली जाते.
हेही वाचा:
गणेश चतुर्थीला बँका राहतील बंद , ही आहे RBI ची यादी; जाणून घ्या





