Pune Crime : महिला कामगाराशी असभ्य चाळे करणाऱ्या व्यवस्थापकास अटक
Updated On:

पुणे – महिला कामगाराशी कामाच्या निमित्ताने अश्लील चाळे करणाऱ्या एका कंपनीच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी नुकतेच गजाआड केले.
मंगेश बादोले (वय ३४, रा. मंतरवाडी, उरुळी देवाची) असे या व्यवस्थापकाचे नाव आहे. हा प्रकार मंतरवाडी येथील एका गोडावूनमध्ये फेब्रुवारी ते ११ सप्टेंबर २०२१ दरम्यान घडला. याप्रकरणी एका महिलेने बुधवारी ( दि. २२) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित आरोपीने पदाचा गैरफायदा घेत कामाचे निमित्त करुन या महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.





