Pune News : तळोजा गोळीबार प्रकरणातील तीन आरोपी पुण्यात जेरबंद; आंबेगाव पोलिसांची कारवाई
Pune News : तळोजा परिसरात आर्थिक वादातून एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन फरारी आरोपींना पुण्यातील आंबेगाव पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे.

Pune News : आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादात एका व्यक्तीला मारहाण करून पिस्तुलातून गोळीबार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांना पाहिजे असलेल्या तीन आरोपींना पुण्यातील आंबेगाव पोलिसांनी पकडले. दत्तनगर परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. तिघांना पुढील तपासासाठी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Pune News)
रुद्र दादासाहेब बारवकर (वय १९, रा. संतोषनगर, कात्रज), अनिकेत प्रताप नरवडे (वय १९, रा. खंडाळे, रांजणगाव, ता. शिरूर) आणि सौरभ गोरख चौधरी (वय २४, रा. संतोषनगर, कात्रज) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील तळोजा फेज-२ परिसरातील शिवाजी चौकाजवळ असलेल्या मारवा इमारतीखाली शनिवारी (दि. २४) पहाटे सव्वाच्या सुमारास ही घटना घडली. आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादात आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली. (Pune News)
त्यानंतर पिस्तुलातून गोळीबार करून गंभीर जखमी करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News)
या गुन्ह्यातील तीन आरोपी पुण्यातील दत्तनगर परिसरात असल्याची गोपनीय माहिती आंबेगाव पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील पोलिस अंमलदार धनाजी धोत्रे आणि सचिन गाडे यांना मिळाली होती. (Pune News)
त्यानुसार पोलिस पथकाने परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत ते तळोजा येथील गोळीबार प्रकरणातील आरोपी असल्याचे समोर आले.त्यानंतर तिघांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. (Pune News)




