Mamata Kulkarni : ममता कुलकर्णीने केली स्वत:ची तुलना ‘गौतम बुद्धाशी’; नेमकं काय म्हणाली पाहा….

Mamata Kulkarni : 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिने आपल्या सौदर्याने प्रेक्षकांना वेड लावले होते. ती अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. मात्र काही दिवसांपूर्वी ती पुन्हा चर्चेत आली आणि तेव्हापासून तिच्याविषयी सतत काही नाही माहिती समोर येत आहेत. या अभिनेत्रीचे नाव आहे ममता कुलकर्णी. ती सध्या प्रयागराज महाकुंभला पोहोचली आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.
ममता कुलकर्णीने महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला आहे. तिला किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवलं जात आहे. ज्यामध्ये ममता कुलकर्णी यांना चादर पोशी विधी करून महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली. ममता कुलकर्णीला आजपासून श्री यामाई ममता नंद गिरि नावाने ओळखली जाईल. जुना आखाडाचे आचार्य नारायण त्रिपाठी यानी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीने भगवे वस्त्र धारण केले. आता अभिनेत्री साध्वी बनली. महामंडलेश्वर बनली आहे. त्यामुळे ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
ममता कुलकर्णीने नुकतंच एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी संवाद साधला असून, यावेळी तिने अनेक बडे खुलासे केले आहे. तसेच आपण बॉलिवूड सोडल्याचं स्पष्ट कारण देखील तिने सांगितलं. आता बॉलिवूडमधून कोणत्याही प्रकारची ऑफर आली तर मी ती स्वीकारणार नाही. आता मला जर कोणी एखादा प्रोजेक्ट दिला तर माझ्यासाठी तो निव्वळ वेळेचा अपव्यय ठरेल, असं ममताने स्पष्ट केलं.
ममता म्हणाली की, ‘माझ्यावर सिनेमा काढण्यासाठी नेटफिलिक्सने दोन वर्षापूर्वीच ऑफर दिली होती. अनेक निर्मातेही माझ्या आयुष्यावर फिल्म बनवण्यास उत्सुक होते. कारण तिने अनेक मुलाखतीत तिचा जीवन प्रवास बुद्धाच्या जीवन प्रवासासारखा असल्याचं म्हटलंय. बुद्धाने महाल सोडला. तसंच मीही ऐश्वर्य सोडून या मार्गावर आल्याचं तिने म्हटलंय.
दरम्यान, बुद्धाशी तुलना केल्याने लोक नाराज झाले होते. त्यावर तिने पुन्हा एकदा आपलं मत मांडलं आहे. बुद्ध आपल्या वडिलांचा महाल सोडून सत्याच्या शोधात निघाले होते. माझ्या मनातही असाच विचार चमकला. मीही बॉलिवूडमध्ये होते. ऐषोआरामी जीवन जगत होते. मी 48 सिनेमात काम केलं. मी अनेक कॉन्सर्ट केले. वर्ल्ड टूर केली. माझ्याकडे चार पासपोर्ट आहेत. दोन कार आहेत. आणि 10 नोकर आहेत. हे सर्व सोडून मी संन्यास मार्गाला लागले आहे, असं ती म्हणाली.
अभिनेत्रीने तिच्या भूतकाळातील आयुष्याविषयी देखील सांगितले की, “मला बॉलिवूडने मला नाव आणि प्रसिद्धी दिली. यानंतर बॉलीवूडचाही पाठिंबा कमी झाला. सन 2000 ते 2012 पर्यंत मी तपश्चर्या करत राहिले. मी अनेक वर्षे दुबईत होते आणि दोन बेडरूमच्या हॉलमध्ये राहिले आणि 12 वर्षे ब्रह्मचारी होते.
ममता विषयी बोलायचे झाले तर 1992 मध्ये आलेल्या तिरंगा या सुपरहिट चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ममता कुलकर्णीने जवळपास 40 बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. आशिक आवारा, करण अर्जुन, वक्त हमारा है आणि क्रांतिवीर यांसारख्या मोठ्या चित्रपटांतून तिने आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य केले. 2001 मध्ये रिलीज झालेला छुपा रुस्तम हा तिचा शेवटचा हिट चित्रपट होता. यानंतर तिने मनोरंजन उद्योगाला अलविदा केला आणि केनियाला गेली. ममताने हिंदीशिवाय कन्नड, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे.





