“भारतीयांना साखळ्यांनी बांधणे, अमानुष अन् लज्जास्पद” ; ममता बॅनर्जी यांची पंतप्रधान मोदींवर टीका

Mamata Banerjee On US । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमेरिकेतून भारतीयांना बेड्या घालून परत पाठवण्याच्या कृतीचा निषेध केला आहे. तसेच भारतीयांना अमेरिकेकडून देण्यात आलेली वागणूक ही अमानुष आणि “लज्जास्पद” असल्याचे म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडच्या अमेरिका दौऱ्यात या “अमानवी वर्तना” विरोधात निषेध नोंदवला होता का, असा सवाल देखील ममता बॅनर्जी यांनी यावेळी विचारला.
केंद्र सरकारवर तीव्र हल्ला चढवत, बॅनर्जी यांनी भारतीय नागरिकांना परत पाठवण्याबाबत केंद्र सरकारच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भारतीयांचे सन्माननीय परतणे सुनिश्चित न केल्याबद्दल ममतांनी केंद्र सरकारवर टीका केली.
पंतप्रधान, तुम्ही तुमचा निषेध नोंदवला का? Mamata Banerjee On US ।
पंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असताना ममता बॅनर्जी यांनी, “जे परतले त्यांना बेड्या घालून परत पाठवण्यात का आले ? असा सवाल त्यांनी केला. असे म्हटले जात आहे कि हा त्यांचा प्रोटोकॉल आहे. पंतप्रधान, तुम्ही अमेरिकेत (अधिकृत दौऱ्यावर) असताना, बेकायदेशीर स्थलांतरितांना बेड्या घालून परत पाठवण्यात आले. वेगवेगळ्या देशांसाठी प्रोटोकॉल वेगवेगळे असू शकत नाहीत. मानवता प्रथम आली पाहिजे. पण, तुम्ही (पंतप्रधानांनी) याबद्दल एकदा तरी निषेध नोंदवला का?” असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
लोकांना साखळदंडात बांधणे लज्जास्पद
ज्या “अमानवी परिस्थितीत” निर्वासितांना भारतात परत पाठवण्यात आले त्याबद्दल ममतांनी चिंता व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाल्या की, असे वर्तन टाळता आले असते. “निर्वासितांना बेड्या घालून परत पाठवणे लज्जास्पद आहे,” ही खूप चिंतेची बाब आहे.”असेही त्यांनी यावेळी म्हटले. त्यासोबतच,” केंद्र सरकारने निर्वासित लोकांना अशा स्थितीत सोडण्याऐवजी परत आणण्यासाठी स्वतःच्या विमानांची व्यवस्था करायला हवी होती.” असेही त्यांनी म्हटले.
जर आपले लोक तिथे असते तर… Mamata Banerjee On US ।
राष्ट्रीय सुरक्षा किंवा परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यांवर भाष्य करण्यास नकार देत, मुख्यमंत्री म्हणाल्या की, सरकार पश्चिम बंगालमधील नागरिकांना सन्मानाने वागवण्याची खात्री करू शकले असते, “जर आमचे लोक तिथे असते तर आम्ही त्यांना परत आणण्याची जबाबदारी घेऊ शकलो असतो.” असा दावा त्यांनी यावेळी केला. अमेरिकेतून हद्दपार करताना पश्चिम बंगालमधील अनेक बेकायदेशीर स्थलांतरितांना कठोर वागणूक दिल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे हे विधान आले आहे.





