Mamata Banerjee : धाडस असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा; ममता बॅनर्जींचे बंडखोरांना थेट आव्हान
तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी शनिवारी पक्षातील बंडखोरांना थेट आव्हान दिले. धाडस असेल तर भाजपपुरस्कृत अप्रामाणिक खेळ करण्यापेक्षा त्या पक्षात प्रवेश करा आणि माझ्याशी लढा, असा इशारा त्यांनी दिला.

Mamata Banerjee : तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी शनिवारी पक्षातील बंडखोरांना थेट आव्हान दिले. धाडस असेल तर भाजपपुरस्कृत अप्रामाणिक खेळ करण्यापेक्षा त्या पक्षात प्रवेश करा आणि माझ्याशी लढा, असा इशारा त्यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने तृणमूलला पश्चिम बंगालची सत्ता (Mamata Banerjee) गमवावी लागली. त्यानंतर त्या पक्षात फुटीचे सत्र सुरू झाले. एवढेच नव्हे तर, बंडखोर गटाने थेट पक्षावर ताबा मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या.
अशात आणखी एक निकटवर्तीय सहकारी चंद्रिमा भट्टाचार्य यांनी ममतांची साथ सोडली. त्यामुळे बहुधा अस्वस्थ झालेल्या ममतांनी सोशल मीडियावरून नेहमीच्या आक्रमक शैलीत भूमिका मांडली.
त्यांनी बंडखोरांचा उल्लेख कृतघ्न गद्दार या शब्दांत केला. निवडणुकीआधी बंडखोरांचे बंड कुठे गेले होते? आताचे बंडखोर मागील १५ वर्षे तृणमूलच्या तिकिटांवर मंत्री, खासदार, आमदार बनले. त्या कालावधीत त्यांचा असंतोष कुठे गेला होता, असे उपरोधिक सवाल त्यांनी (Mamata Banerjee) व्हिडीओ संदेशातून केले.
बंडखोरांवर निशाणा साधतानाच ममतांनी त्यांच्या कृत्यासाठी एकप्रकारे भाजपला थेट जबाबदार ठरवले. सध्याच्या कठीण काळात तृणमूलवर निष्ठा ठेऊन असणाऱ्या कार्यकर्त्यांचा उल्लेख त्यांनी पक्षाची सोन्याची खाण म्हणून केला.






