Shirur News : महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका; महिनाभरापासून मलठण-शिंदेवाडीतील पाणीपुरवठा ठप्प
Shirur News : महावितरणच्या गलथान कारभारामुळे मलठण-शिंदेवाडी परिसरात महिनाभरापासून पाणीपुरवठा बंद आहे.

Shirur News : महावितरणच्या गलथान व भोंगळ कारभाराचा थेट फटका मलठण-शिंदेवाडी परिसरातील नागरिकांना बसत असून, गेल्या महिनाभरापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असतानाच, नुकतीच लागवड करण्यात आलेली तब्बल २५ हजार रोपे पाण्याअभावी संकटात सापडली आहेत. (Shirur News)
मलठण-शिंदेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर नवीन वृक्षलागवड करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असला, तरी या रोपांना नियमित पाणी मिळणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या महिन्यापासून पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम असल्याने या रोपांना पाणी देणेही अशक्यप्राय झाले आहे. त्यामुळे मोठ्या मेहनतीने आणि खर्च करून लावण्यात आलेली हजारो रोपे वाळण्याच्या मार्गावर असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. (Shirur News)
विशेष म्हणजे मलठण-शिंदेवाडी स्मशानभूमीसाठी ६५ डीपी असल्याचे सांगण्यात येत असून, विद्युत व्यवस्थेतील अडचणी आणि महावितरणच्या कारभारामुळे नागरिकांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विद्युत यंत्रणेतील बिघाड, देखभाल-दुरुस्तीतील दिरंगाई आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव यामुळे पाणीपुरवठा यंत्रणाच अडचणीत आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (Shirur News)
एकीकडे ‘हरित गाव’ आणि वृक्षलागवडीचे उपक्रम राबविले जात असताना दुसरीकडे लावलेल्या रोपांना पाणी देण्यासाठी आवश्यक व्यवस्था उपलब्ध होत नसेल, तर या उपक्रमांचा उपयोग काय? असा संतप्त सवाल माजी सरपंच नाना फुलसुंदर व नागरिक उपस्थित करीत आहेत. (Shirur News)
महावितरण आणि संबंधित प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन विद्युत पुरवठ्यातील अडचणी तातडीने दूर कराव्यात, पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि २५ हजार रोपे वाचविण्यासाठी तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (Shirur News)
प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांचे पाणी आणि पर्यावरणाची हजारो रोपे दोन्ही धोक्यात आली असून, आता तरी संबंधित अधिकारी जागे होणार का? असा संतप्त सवाल मलठण-शिंदेवाडी ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. (Shirur News)
Shirur News : उरळगावात दोन शेतकऱ्यांच्या बोअरमधील मोटारींसह केबलची चोरी; 17 हजारांचा मुद्देमाल लंपास





