29 जानेवारीला येतोय ‘या’ कंपनीचा IPO, शेअरची किंमत 90 रुपये, ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त प्रतिसाद

Malpani Pipes IPO: तुम्ही जर आयपीओमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. पुढील काही दिवसांमध्ये शेअर बाजारात अनेक आयपीओ येणार आहेत. यापैकीच एक आयपीओ मालपाणी पाइप्स कंपनीचा आहे. कंपनीचा आयपीओ 29 जानेवारीला गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. या आयपीओला ग्रे मार्केटमध्येही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मालपाणी पाइप्स कंपनी आयपीओच्या माध्यमातून 25.92 कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओ अंतर्गत पूर्णपणे फ्रेश शेअर्स जारी केले जाणार आहेत. कंपनीकडून आयपीओंतर्गत 28.80 लाख शेअर्स जारी केले जातील
मालपाणी पाइप्सचा आयपीओ 29 जानेवारी 2025 ला गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. गुंतवणूकदारांकडे 31 जानेवारीपर्यंत बोली लावण्याची संधी असेल. त्यानंतर 3 जानेवारीला शेअर्सचे वाटप व 5 फेब्रुवारीला बीएसईवर लिस्टिंग होईल.
आयपीओ अंतर्गत प्रति शेअरसाठी 85 ते 90 रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आले आहे. 1600 शेअर्सचा एक लॉट निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमीत कमी 1,44,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिपोर्टनुसार, सध्या आयपीओ 25 रुपयांच्या जीएमपीवर ट्रेड करत आहे. त्यामुळे लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत मोठी वाढ होऊ शकते.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)





