‘बिग बॉस १९’ मध्ये मल्लिका शेरावत होणार सहभागी? स्वतः केला खुलासा

Mallika Sherawat | ‘बिग बॉस १९’ या लोकप्रिय शोची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. यातच आता या शोमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार? याबाबतच्या नावांची चर्चा होत आहे. यंदाच्या सीझनमध्ये बॉलिवूडची अभिनेत्री मल्लिका शेरावत देखील सामील होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र याबाबत तिने स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने खुलासा केला आहे.
मल्लिका शेरावतने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्टमध्ये लिहिले की, ”मी ह्या सर्व अफवा फेटाळत आहे. मी बिग बॉस करत नाही आणि कधीही करणार नाही. धन्यवाद…” अभिनेत्रीची ही पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामुळे शोमध्ये तिच्या प्रवेशाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
मल्लिका शेरावत लॉस अँजेलिसला शिफ्ट झाली असून कामानिमित्त ती अनेकदा भारतात येते. ती शेवटची २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमार रावच्या ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ या चित्रपटात दिसली होती. तर बिग बॉसच्या 18 व्या सीझनमध्ये मल्लिका गेस्ट म्हणून पाहायला मिळाली होती. Mallika Sherawat |
नवा लोगो समोर
सलमान खानच्या ‘बिग बॉस शो ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होऊ शकतो. मात्र निर्मात्यांनी अद्याप शोच्या प्रीमियरची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. काही दिवसांपूर्वीच या शोच्या नव्या लोगोचा प्रोमो समोर आला होता. Mallika Sherawat |
हेही वाचा :





