Malegaon News | शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस खाक ; साडेसात लाखांचे नुकसान

प्रभात वृत्तसेवा
माळेगाव – माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे (दि. १२) ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता माळेगाव बुद्रुक येथील गट नं. ३७३ मध्ये विजेच्या तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन तीन एकर ऊस जळून खाक झाला. जळित ऊस क्षेत्राचा पंचनामा तलाठी निलम देशमुख यांनी केला आहे.बोअर वेल, विद्युत मोटार, पाइपलाइन व ड्रिप सिंचन यंत्रणाही पूर्णतः नष्ट झाली. दुर्घटनेत सुमारे साडेसात लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. महसूल विभागाने पंचनामा केला आहे.
ही शेती दीपक चंद्रकांत तावरे व सुनीता दीपक तावरे (रा. माळेगाव बुद्रुक) या शेतकरी दाम्पत्याची असून त्यांनी नुकतेच ऊसाचे पीक जोमात आणले होते. दुर्घटनेच्या वेळी शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. काही मिनिटांत संपूर्ण क्षेत्र जळून खाक झाले. जळिताचा पंचनामा तलाठी निलम देशमुख यांनी केला. साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद अधिकृतपणे करण्यात आली आहे.
शेतकरी दीपक तावरे यांनी म्हणाले की, महावितरणच्या चुकीमुळे आमचे आर्थिक नुकसान झाले असून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी. घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महावितरणकडून भरपाईची कार्यवाही व्हावी, अशी मागणी स्थानिक स्तरावरून होत आहे.





