India-Maldives Relations : भारताबरोबरच्या संबंधांचे मालदीवच्या विरोधकांकडून स्वागत…

माले – भारताबरोबरच्या संबंधांमध्ये मालदीव सरकारने केलेल्या मोठ्या बदलांचे तेथील प्रमुख विरोधी पक्षाकडून स्वागत केले आहे. सरकारने भारताबरोबरच्या धोरणात केलेल्या बदलांबद्दल मालदीवन डेमोक्रॅटिक पार्टीने अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांचे अभिनंदन केले आहे.
मालदीवला संकटसमयी मदत करण्यासाठी भारत नेहमीच अग्रस्थानी असेल, असा मालदीवच्या नागरिकांना विश्वास वाटतो आहे, अशी प्रतिक्रिया मालदीवन डेमोक्रॅटिक पार्टीचे अध्यक्ष अब्दुल्ला शाहिद यांनी दिली आहे. मालदीवच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या भेटीच्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मालदीवमधील सध्याच्या सरकारने सुरुवातीच्या काळात भारतविरोधी धोरण अनुसरले होते. आक्रमक घोषणाबाजी, कुचेष्ठा आणि काळाच्या कसोटीवर खऱ्या उतरलेला मित्र देशआणि विकास भागीदाराला प्रदेशातील गुंड म्हणून हिणवले गेले. यामुळे मालदीवचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नुकसान झाले.
Nepal-India Relations : परराष्ट्र सचिव मिस्री नेपाळच्या दौऱ्यावर, जाणून घ्या कारण…..
आर्थिक नुकसान झाले आणि इतर अनेक अनावश्यक समस्या आणि आव्हाने उभी राहिली होती, असेही ते म्हणाले. मात्र आता इंडिया आऊट धोरण सोडून मुइझ्झू यांच्या सरकारने भारताशी जुळवून घेण्याचे धोरण स्वागतार्ह आहे, असेही शाहिद म्हणाले.

