India-Maldives Relations : हिंद महासागरात मालदीव हा भारताचा महत्वाचा भागीदार – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

India-Maldives Relations : – मालदीव हा हिंद महासागरातील भारताचा महत्वाचा भागीदार आहेत आणि दोन्ही देश त्यांच्यातील सहकार्य आधुनिक भागीदारीत रूपांतरित करू इच्छितात. असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. जयशंकर यांनी मालदीवचे परराष्ट्र मंत्री मूसा जमीर यांच्याशी चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अड्डू पुनर्पाप्ती रिक्लेमेशन आणि किनारपट्टी संरक्षण प्रकल्पाचे हस्तांतरण आणि भारताच्या सहकार्याने विकसित केलेल्या ४ मार्गिकांच्या डेटोर लिंक रोड प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
मालदीव हा हिंद महासागरातील भारताचा महत्वाचा भागीदार आहे. भेजारी प्रथम या धोरणाच्या केंद्रस्थानी मालदीव आहे. त्यामुळेच दोन्ही देशांमधील सहकार्य पारंपारिक भूमिकेच्या पुढे गेले आहे. आज आधुनिक भागीदारीत हे संबंध रुपांतरित व्हावे, अशी दोन्ही देशांची महत्वाकांक्षा आहे, असे जयशंकर म्हणाले.
ही भागीदारी लोकांच्या जीवनातील प्रत्येक पैलूशी संबंधित आहे. लोकांच्या जीवनात या भागीदारीचे मूर्त रुप शोधले जात आहे. गेल्या काही वर्षात भारताने मालदीवमध्ये २२० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. मालदीवमध्ये प्रादेशिक विकासाला भारत चालना देऊ पहात असल्याचे यातून दिसते आहे. भारत सध्या सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारतातून मालदीवमधील पर्यटन उद्योगात मोठी गुंतवणूक होऊ पहाते आहे, असेही जयशंकर यांनी सांगितले.
जयशंकर यांनी मालदीवमध्ये भारताच्या सहाय्याने हाती घेतलेल्या इतर प्रकल्पांवरही प्रकाश टाकला.
India-Maldives Relations : भारताबरोबरच्या संबंधांचे मालदीवच्या विरोधकांकडून स्वागत…
अड्डू पुनर्पाप्ती आणि किनारपट्टी संरक्षण प्रकल्प….
अड्डू पुनर्पाप्ती आणि किनारपट्टी संरक्षण प्रकल्पाद्वारे या भागामध्ये स्थायी विकास घडवण्याचा प्रयत्न आहे. या भागातील १८४ हेक्टरच्या भागाची पुनर्पाप्ती या वर्षाच्या सुरुवातीला करण्यात आली होती. ८० दशलक्ष डॉलरच्या या कार्यक्रमातून पर्यटनसाठी विकास तसेच अड्डूचा सर्वांगीण आर्थिक विकास केला जाणार आहे. या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासातून रोजगार, उद्योगशीलता आणि व्यापाराच्या संधी विकसित केल्या जाणार आहेत. भारताच्या पतहमीच्या आधारे गान आंतरराष्ट्रीय विमानतळाची फेरउभारणी केली जात आहे. यामुळे अड्डू अटोल आणि उर्वरित मालदीवमधील संलग्नता वाढेल.





