Malaika Arora : ‘मलायका-अरबाज’ पुन्हा आले एकत्र; खान फॅमिलीसोबत अभिनेत्रीचा खास लंच, Video व्हायरल!

Arbaaz Khan | Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांनी 1998 मध्ये लग्न केले आणि 19 वर्षांच्या लग्नानंतर 2017 मध्ये एकमेकांना घटस्फोट दिला. दोघांना एक मुलगा ‘अरहान खान’ आहे, जो आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. त्यांच्या घटस्फोटाला 7 वर्षे झाली आहेत आणि खान कुटुंब आणि मलायका अरोरा एकत्र दिसले असे फार कमी प्रसंग आहेत. यावर्षी, अभिनेत्रीच्या वडिलांच्या निधनानंतर, अरबाज खान आणि त्याचे संपूर्ण कुटुंब अभिनेत्रीच्या दुःखात सामील झाले होते.
नुकतेच मलायका अरोराने मुंबईत तिचे नवीन रेस्टॉरंट लॉन्च केले आहे. जिथे पुन्हा एकदा अरबाज खान त्याच्या कुटुंबासह पोहोचला, ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अरबाज खान व्यतिरिक्त सलीम खान, सुशीला चरक (सलमा खान), हेलन, सोहेल खानचा मुलगा निर्वाण आणि सलमान खानची बहीण अलविरा आपल्या कुटुंबियांसोबत मलायकाच्या नवीन रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. मात्र, सलमान खानसह कुटुंबातील काही सदस्यही बेपत्ता असल्याचे यावेळी दिसून आले.
View this post on Instagram
याशिवाय सोहेल खान आणि अरबाजची पत्नी शूरा खानही दिसली नाही. त्यानंतर आता सोशल मीडियावर सलमान खानच्या कुटुंबाचे खूप कौतुक केले जात आहे. दु:ख असो वा सुख, खान कुटुंब नेहमीच त्यांच्या लोकांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येते. अरबाज आणि मलायका यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असला तरी खान कुटुंब आजही तिला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानते आणि त्यांच्या सुख-दु:खात एकत्र दिसतात. व्हायरल होत असलेले सर्व फोटो आणि व्हिडिओवर नेटकरी कमेंट करत असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर आता एकत्र नाहीत. गेले 6 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघे अधिकृतपणे वेगळे झाले आहेत. अर्जुन कपूरने ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. तेव्हापासून मलायका आपल्या नवीन व्यवसायात गुंतल्याच दिसून येत आहे.
अन् मला रेस्टॉरंट सुरू करण्याची कल्पना सुचली….
मलायका आणि तिचा मुलगा अरहान यांना जेवणाची खूप आवड आहे. एका मुलाखतीत मलायकाने सांगितले होते की, जेव्हा ती तिच्या मुलासोबत देश आणि जगभर फिरते तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जेवणाची चव चाखते. तेथूनच हे रेस्टॉरंट सुरू करण्याची कल्पना सुचली. असं ती म्हणाली होती.





