अखेर नात्याला दिला पूर्णविराम.! मलायका आणि अर्जुन कपूर यांनी घेतला मोठा निर्णय

Malaika Arora | Arjun Kapoor – बॉलिवूडमधील अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा या कपलची कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चा रंगलेली असते. अनेकदा ते दोघे एकत्र फिरताना दिसतात. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून अनेक फोटो ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. कधी या स्टार्सना ट्रोल केलं जातं तर कधी लाईकही केलं जातं.
अर्जुन आणि मलायका अनेकदा एकमेकांवर किती प्रेम करतात हे व्यक्त करतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासुन या दोघांच्या ब्रेकअपची बातमी तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा हे कपल वेगळं झाल्याचं यातून सांगण्यात येत आहे.
विभक्त होण्याचा निर्णय देखील दोघांनी सहमतीने घेतला आहे. दोघांच्या नात्याचा प्रवास आता संपला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय मलायका आणि अर्जुन यांचं नातं फार खास आहे. दोघांच्या मनात एकमेकांसाठी खास स्थान आहे. तसेच दोघांच्या आयुष्यात एकमेकांसाठी खूप स्पेशल जागा होती आणि ती कायम राहिल. असं देखील सांगण्यात आलं आहे.
View this post on Instagram
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनीही यावर मौन बाळगणं पसंत केलं आहे. कारण त्यांना असं वाटत नाही की, त्यांच्या नात्यावर कोणतीही टीका-टीप्पणी केलेली नकोय.. त्यांचं नातं बराच काळ टिकलं, पण आता ते संपलं असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले होते. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2019 मध्ये मलायका आणि अर्जुन यांनी आपल्या नात्याचा स्वीकार केला. गेल्या 8 वर्षांपासून मलायका-अर्जुन एकत्र आहेत.
अभिनेत्री मलायकाला छैय्या छैय्या या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मलायका ही फॅशन शोचे परीक्षण करते. तर अभिनेता अर्जुनने ‘इश्कजादे’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अर्जुनच्या गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.





