‘धुरंधर’ बनवून खूप वाईट केले, कारण… श्रद्धा कपूरची पोस्ट; नेमकं काय म्हणाली?

Shraddha Kapoor | अभिनेता रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘धुरंधर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय-थ्रिलर चित्रपटाने केवळ ११ दिवसांत ३०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद आणि प्रशंसेमुळे चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
अनेक बॉलीवूड कलाकरांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. यानंतर आता श्रद्धा कपूरने ‘धुरंधर’ पाहिल्यानंतर लिहिलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. श्रद्धा कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलेकी, “आदित्य धरने ‘धुरंधर’ बनवून खरंच खूप वाईट केले आहे, कारण दुसऱ्या भागासाठी त्यांनी आम्हाला तीन महिने वाट पाहायला लावली आहे. आमच्या भावनांशी खेळू नका! कृपया दुसरा भाग लवकर प्रदर्शित करा. ‘धुरंधर’ एक उत्कृष्ट अनुभव आहे, जर सकाळी शूटिंग नसती तर लगेच जाऊन चित्रपट पुन्हा पाहिला असता”, असं ती म्हणाली. Shraddha Kapoor |
View this post on Instagram
श्रद्धाने पुढे लिहिले की, २०२५ साल हिंदी सिनेमासाठी एक मजबूत काळ आहे. त्यांनी छावा, सैयारा आणि धुरंधर या चित्रपटांचा उल्लेख केला. याशिवाय श्रद्धा कपूर चित्रपटाबाबत झालेल्या निगेटिव्ह पीआर आणि तयार केलेल्या वादांवरही बोलली.
श्रद्धा म्हणाली, “यामी गौतमला नकारात्मक पीआर आणि काही वादांना सामोरे जावे लागले, पण ‘धुरंधर’ने या सगळ्यावर मात करत बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कोणतीही वाईट गोष्ट एका चांगल्या चित्रपटाला अपयशी करु शकत नाही. आम्हाला प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास आहे.” Shraddha Kapoor |
दरम्यान, या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्ना दरोडेखोर रेहमानच्या भूमिकेत दमदार अभिनय करताना दिसत आहे. यातील त्याच्या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. रणवीर सिंग, संजय दत्तसह आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका चित्रपटाची ताकद वाढवतात. सध्या सगळीकडे याच सिनेमाची चर्चा रंगली आहे. Shraddha Kapoor |
हेही वाचा:
सुप्रिया सुळे घेणार अमित शाहांची भेट; महापालिका निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग





