Satara : महाबळेश्वरमध्ये मकरंद पाटील यांचे जल्लोषात स्वागत

महाबळेश्वर : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंदआबा जाधव पाटील यांचे महाबळेश्वर शहरामध्ये महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महाबळेश्वरवासियांकडून फटाक्याच्या आतषबाजीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.मकरंद आबा पाटील यांच्या स्वागतासाठी महाबळेश्वर शहरामध्ये सकाळपासून जय्यत तयारी सुरु होती.
छत्रपती शिवाजी महाराज सर्कल येथे मकरंद आबा पाटील यांचे आगमन झाल्यावर जेसीबीच्या साह्याने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. डीजे, हलगी, फटाक्यांची आतषबाजी करत मकरंद पाटील यांचे स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुर्गा देवी मंदिरामध्ये देवीच्या चरणी नतमस्तक होत देवीचे दर्शन घेतले.
महायुतीच्या सर्वच महिलांनी एकत्र येत मंत्री मकरंद पाटील यांचे औक्षण करण्यात आले. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांसमवेत मुख्य बाजारपेठमार्गे शहरवासीयांना अभिवादन करत नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात येताच महाबळेश्वरमधील सर्वच नेते व सर्वसामान्य नागरिकांनी मंत्री मकरंद (आबा) पाटील यांच्यासाठी तयार केलेला हार क्रेनच्या साह्याने घालण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक किसनशेठ शिंदे, अफजलभाई सुतार, प्रकाश पाटील, संदीप साळुंखे, मुबारक शेख, नासिरभाई मुलाणी, रवींद्र कुंभारदरे, सुनीलशेठ शिंदे, रोहित ढेबे, अँड. संजय जंगम, माजी नगराध्यक्षा विमलताई पारठे, माजी नगरसेविका विमलताई ओंबळे, शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू, सचिन गुजर, सुनील ढेबे, उस्मान खारकंडे, संजय ओंबळे, गौरव राक्षे, प्रशांत भोईटे, राजेंद्र पवार, चिन्मय आगरकर, महेंद्र परदेशी, पंकज येवले, तौफिक पटवेकर, फकीरभाई वलगे, शरद बावळेकर, दत्तात्रय वाडकर, किरण शिंदे, उषा ओंबळे, श्रद्धा रोकडे, भक्ती जाधव, सुरेखा देवकर, वर्षा आरडे, मेघा चोरगे, सुनीता फळणे, शीतल ओतारी, अपूर्वा डोईफोडे, प्रभा नायडू, छाया शिंदे, लता आरडे, मानकुंबरे ताई, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित होते.





