Khavdya Dongar Case : खवड्या डोंगर प्रकरणात मोठा ट्विस्ट! ‘आयफोन’च्या चर्चेचा फुगा फुटला; पोलिसांच्या खुलाशाने प्रकरणाला नवं वळण
Khavdya Dongar Case : खवड्या डोंगरावर १८ वर्षीय तरुण कुणाल चांदगुडे आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

Khavdya Dongar Case : वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावर मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांसह १८ वर्षीय कुणाल चांदगुडे याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर कुणालने आयफोन किंवा मोबाईलच्या हप्त्यांवरून झालेल्या वादातून टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. मात्र, पोलिसांनी या चर्चेला स्पष्टपणे नकार दिला आहे. (Khavdya Dongar Case)
छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी या प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली. प्राथमिक तपासात आयफोन किंवा मोबाईल हा आत्महत्येचा कारणीभूत घटक असल्याचं स्पष्ट झालेलं नाही, असं त्यांनी सांगितलं. (Khavdya Dongar Case)
आईच्या संवादातून महत्त्वाचा सुगावा
घटनेच्या वेळी पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी कुणालची समजूत काढण्यासाठी अनेक तास प्रयत्न केले. यावेळी कुणालची आई त्याच्याशी संवाद साधत होती. (Khavdya Dongar Case)
“तू काही अडचणीत असशील तर आपण ती अडचण सोडवू,” अशा आशयाने ती त्याला वारंवार समजावत होती. त्यामुळे कुणाल कोणत्या तरी गंभीर तणावातून जात असल्याचा अंदाज पोलिसांना आला आहे. (Khavdya Dongar Case)
दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्याला शांत करण्यासाठी “मोबाईल घेऊन देतो” असं म्हटलं होतं. मात्र, त्या एका वाक्यावरून कुणालने आयफोनसाठी आत्महत्येचा प्रयत्न केला, असा निष्कर्ष काढता येणार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. (Khavdya Dongar Case)
घरातील तिन्ही व्यक्तींचा मृत्यू; तपासाचं आव्हान वाढलं
या घटनेत कुणालसह त्याचे आई-वडील मुरलीधर आणि संगिता यांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुटुंबातील नेमकी परिस्थिती काय होती, कुणाल कोणत्या कारणामुळे तणावात होता आणि त्याचा नेमका कोणाशी वाद झाला होता, याबाबत माहिती देणारा घरातील कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार आता उरलेला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर या घटनेमागील मूळ कारण शोधण्याचं मोठं आव्हान आहे. (Khavdya Dongar Case)
‘आयफोनच्या अफवांवर विश्वास ठेवू नका’
डीसीपी रत्नाकर नवले यांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अपुऱ्या किंवा अप्रमाणित माहितीकडे पाहताना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. आयफोन किंवा मोबाईलच्या हप्त्यांवरूनच कुणालने हे टोकाचं पाऊल उचललं, असं सध्या म्हणता येणार नाही. आत्महत्येमागे एक कारण होतं की अनेक कौटुंबिक अथवा आर्थिक कारणं होती, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. (Khavdya Dongar Case)






