Railway Accident : मोठा रेल्वे अपघात..! १५ जणांचा मृत्यू; ट्रॅकवर रक्ताचा सडा, प्रवाशांची पळापळ

लिस्बन (पोर्तुगाल) : पोर्तुगालच्या राजधानी लिस्बनमध्ये बुधवारी संध्याकाळी घडलेल्या भीषण फ्युनिक्युलर दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवले आहे. ऐतिहासिक ग्लोरिया फ्युनिक्युलर ही पर्यटकांच्या आकर्षणाची ट्राम दुर्घटनाग्रस्त झाली असून, यात किमान १५ जणांचा मृत्यू झाला आहे.
तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत, त्यापैकी काहींची स्थिती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि वैद्यकीय टीम घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे लिस्बन शहर आणि संपूर्ण पोर्तुगालमध्ये खळबळ उडाली असून, गुरुवारी राष्ट्रीय शोक दिवस जाहीर करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
लिस्बनच्या मध्यवर्ती भागात, रेस्टोराडोर्स स्क्वेअर ते बॅरो अल्टो या भागांना जोडणाऱ्या १४० वर्षांच्या जुन्या ग्लोरिया फ्युनिक्युलर लाइनवर हा अपघात घडला. ही लाइन १८८५ मध्ये सुरू झाली असून, ती शहराच्या खड्डेवाडीच्या रस्त्यांवरून प्रवाशांना वाहून नेते. बुधवारी संध्याकाळी सुमारे ६ वाजता झालेल्या अपघातात केबल तुटल्याने फ्युनिक्युलरचा ट्रॅकवरून तोल गेला.
🇵🇹 At least 15 dead and 18 injured: 5 seriously, 13 lightly (including a child) after Lisbon’s iconic Gloria Funicular, also known as the Elevador Da Glória, derailed, according to CNN Portugal. pic.twitter.com/aL0rPQxsHO
— Pisklauren (@pisklauren) September 3, 2025
ब्रेक अपयशी ठरल्याने ही ट्राम वेगाने खाली सरकली आणि रस्त्याच्या वळणावर एका इमारतीला धडकली. यामुळे ट्राम पूर्णपणे उलटली आणि चक्काचूर झाली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, “ट्राम ब्रेकशिवाय वेगाने खाली सरकली आणि इमारतीला जोरदार धडक दिली, ती कार्डबोर्ड बॉक्सप्रमाणे तुकडे होऊन गेली,” असे पोर्तुगीज टीव्ही चॅनेल SIC ला सांगितली.
पोर्तुगालच्या आरोग्य मंत्रालयानुसार, मृतांमध्ये पोर्तुगीज आणि परदेशी नागरिक (जसे की जर्मन, स्पॅनिश, कॅनेडियन, कोरियन, इतालियन, फ्रेंच, स्विस, मोरोक्कन आणि केप व्हर्डियन) समाविष्ट आहेत. मृत्यूसंख्येत प्रथम १५ असा अंदाज होता, पण रात्री दोन जखमींचा मृत्यू झाल्याने आता १७ झाली आहे. जखमींमध्ये ५ ते ७ जणांची स्थिती गंभीर आहे. सर्व मृत मंडळी प्रौढ असल्याचे सांगितले जात आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.




