Kartiki Yatra : कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदी, देहूगावच्या वाहतुकीत मोठे बदल
१ ते ८ डिसेंबर दरम्यान भाविकांसाठी स्वतंत्र पार्किंग व बस स्थानके

पिंपरी – श्री क्षेत्र आळंदी येथील कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदी व देहूगाव परिसरात १ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२६ या कालावधीत आळंदी व देहूगावकडे जाणाऱ्या जड-अवजड आणि खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
कार्तिकी एकादशी (४ डिसेंबर) आणि संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त (६ डिसेंबर) राज्यभरातून १० ते १५ लाख भाविक आळंदी आणि त्यानंतर देहूगाव येथे दर्शनासाठी येतात. या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दिंडीतील वाहने आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहनांवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ‘नो-एन्ट्री’ (प्रवेश बंदी)
- पुणे – आळंदी रस्ता: चऱ्होली फाटा चौक
- मोशी – आळंदी रस्ता: डुडुळगाव जकातनाका
- चिंबळी – आळंदी रस्ता: केळगाव चौक / बोपदेव चौक
- चाकण (आळंदी फाटा) – आळंदी रस्ता: इंद्रायणी हॉस्पिटल
- वडगाव घेणंद मार्गे आळंदी रस्ता: विश्रांतवड
- मरकळ – आळंदी रस्ता: धानोरे फाटा / पीसीएस चौक
- देहूगाव : देहू कमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक
जड व अवजड वाहनांसाठी प्रवेश बंदी व पर्यायी मार्ग
मोशी चौक, भारतमाता चौक (मोशी), चिंबळी फाटा, आळंदी फाटा, माजगाव फाटा, भोसे फाटा (चाकण), वडगाव घेणंद, पुणे-दिघी मॅगझीन चौक आणि मरकळमार्गे आळंदीकडे येणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच देहूगाव कमान (जुना मुंबई-पुणे महामार्ग), कॅनबे चौक आणि तळेगाव-चाकण रोडवरील देहूफाटा येथून देहूगावकडे जाणाऱ्या जड वाहनांनाही प्रवेश बंद आहे.
पर्यायी मार्ग : जड वाहनांनी जयगणेश साम्राज्य चौक – अलंकापुरम चौक – चोविसावाडी/विश्रांतवाडी/भोसरी मार्गे, भोसरी चौक – मॅगझीन चौक मार्गे किंवा मोशी – चाकण – शिक्रापूर मार्गे इच्छित स्थळी जावे. वडगाव घेणंद व भोसे फाट्याकडून येणाऱ्या वाहनांनी कोयाळी कमान – मरकळगाव मार्गाचा वापर करावा. देहूगाव परिसरातील वाहनांनी भक्ती-शक्ती चौक – त्रिवेणीनगर – तळवडे गावठाण – कॅनबे चौक किंवा एच.पी. चौक – परंडवाल चौक – साईराज चौक – भैरवनाथ चौक मार्गे प्रवास करावा.
भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था
बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी विविध दिशांना पार्किंगची सोय करण्यात आली आहे:
- देहूगाव, मोशी, हवालदार वस्ती फाट्याकडून येणारी वाहने : आळंदी-देहू रोडवरील तळेकर पाटील चौक (दक्षिणेस २ एकर व उत्तरेस १ एकर). (पोलीस
- वाहनांसाठी डुडुळगाव येथील आदित्य इंटरनॅशनल स्कूल व ज्ञानविलास कॉलेजजवळ प्रत्येकी १० गुंठे जागा राखीव).चिंबळी फाट्याकडून येणारी वाहने : मुंगसे पार्किंग, बोपदेव चौक (४.५ एकर).
- चाकण – आळंदी फाट्याकडून येणारी वाहने : इंद्रायणी हॉस्पिटलसमोर, चाकण रोड (९ एकर).
- वडगाव घेणंद व शेल पिंपळगावकडून येणारी वाहने : विश्रांतवड वडगाव रोड (२५ एकर) आणि वडगाव चौक आळंदी शौचालयाजवळील नगरपरिषद पार्किंग (३० गुंठे).
- मरकळ गावाकडून येणारी वाहने : पॉलीबॉण्ड कंपनीसमोर गावडे पार्किंग (४ एकर), प्ल्युमेरिया मंगल कार्यालय (२० गुंठे) आणि बैलगाडा घाट चऱ्होली (१ एकर).
- पुण्याकडून येणारी वाहने : मुक्ताई मंगल कार्यालयासमोर (१ एकर).
एसटी आणि पीएमपीएमएल (PMPML) बसचे तात्पुरते थांबे
- यात्रा काळात आळंदी शहरात बस जाणार नसून, प्रवाशांच्या सोयीसाठी खालील ठिकाणी तात्पुरती बस स्थानके उभारली आहेत:
- देहूगावकडे जाण्यासाठी : डुडुळगाव जकातनाका
- पुणे बाजुकडे जाण्या-येण्यासाठी : चऱ्होली फाटा
- वाघोली – शिक्रापूरकडे जाण्या-येण्यासाठी : धानोरे फाटा चौक
- चाकणकडे जाण्या-येण्यासाठी : हनुमानवाडी, इंद्रायणी हॉस्पिटल (विशाल हॉटेलसमोर)
- शिक्रापूर / शेल पिंपळगाव / नगरकडे जाण्या-येण्यासाठी : विश्रांतवड फाटा / चौक (वडगाव रोड)
‘वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व यात्रा निर्विघ्न पार पाडण्यासाठी नागरिक आणि वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करून पोलिसांना सहकार्य करावे.’- विक्रांत देशमुख, उपायुक्त, वाहतूक विभाग.
Construction : शाळेला खेटून बांधकाम; धुळीने चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात!





