Neelam Kothari : गोविंदासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर मोठा खुलासा! अभिनेत्री नीलम कोठारी म्हणाली “मला माहिती नव्हतं की….”
Neelam Kothari : गोविंदाचे अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर्स होते, असा दावा सुनीता यांनी केला होता. त्यानंतर गोविंदानेही या आरोपांवर प्रतिक्रिया देत पत्नीचे दावे फेटाळून लावले.

Neelam Kothari : बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी सुनीता आहुजा यांनी अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबाबत केलेल्या काही दाव्यांमुळे बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. गोविंदाचे अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर्स होते, असा दावा सुनीता यांनी केला होता. त्यानंतर गोविंदानेही या आरोपांवर प्रतिक्रिया देत पत्नीचे दावे फेटाळून लावले.
या सगळ्या चर्चांदरम्यान गोविंदासोबत काम केलेल्या अभिनेत्री नीलम कोठारी यांच्या एका जुन्या नात्याबाबतच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीलम यांनी गोविंदासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.
गोविंदा-नीलमची जोडी होती लोकप्रिय
गोविंदा आणि नीलम कोठारी ही ८०च्या दशकातील बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी होती. दोघांनी तब्बल १४ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असून, त्यापैकी अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले.
पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली होती. त्यामुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही त्यावेळी रंगल्या होत्या. आजही गोविंदा आणि नीलम यांच्या नात्याबाबतच्या चर्चा अधूनमधून समोर येतात.
‘मला खूप उशिरा कळलं की त्यांचं लग्न झालं आहे’
गोविंदासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर बोलताना नीलम यांनी सांगितलं की, त्या काळात त्या खूप तरुण होत्या. त्यामुळे वैयक्तिक नात्यांपेक्षा त्यांचं संपूर्ण लक्ष करिअरवर होतं. नीलम म्हणाल्या, “मी तेव्हा खूप तरुण होते. मला माहिती नव्हतं की त्यांचं लग्न झालं आहे. मला खूप उशिरा याबद्दल कळलं.”
‘रिलेशनशिपमध्ये येणं हा पर्यायच नव्हता’
नीलम यांनी त्यांच्या कुटुंबाबद्दलही या मुलाखतीत खुलासा केला. त्या म्हणाल्या की, त्यांचे पालक खूप कडक होते आणि त्यामुळे रिलेशनशिपमध्ये येण्याचा प्रश्नच नव्हता. “मी खूप तरुण होते आणि माझे पालक खूप स्ट्रिक्ट होते. त्यामुळे माझ्यासाठी रिलेशनशिपमध्ये येणं हा पर्याय कधीच नव्हता. माझं संपूर्ण लक्ष माझ्या फिल्म्स आणि हिंदी शिकण्याकडे होतं.” असं नीलम यांनी सांगितलं.
पुढे त्या म्हणाल्या की, “शूटिंगसाठी जातानाही कुटुंबातील कोणीतरी व्यक्ती नेहमी सोबत असायची. कारण माझ्या कुटुंबात सिनेसृष्टीबद्दल फार चांगलं मत नव्हतं. त्यामुळे माझ्या काळजीपोटी कुटुंबातील एक व्यक्ती नेहमी माझ्यासोबत असायची.
Hartalika: हरतालिकेला चेहऱ्यावर हवाय झटपट ग्लो? घरच्या या ‘३’ गोष्टींनी मिळवा फ्रेश लुक






