महाराष्ट्रात NIA आणि ATSची मोठी कारवाई; ३ संशयितांना घेतले ताब्यात

NIA-ATS Raid | महाराष्ट्रात एनआयए (NIA) आणि एटीएस (ATS) ने मोठी कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, मालेगाव या भागांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. यात तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पहाटेपासूनच महाराष्ट्रातील तीन ठिकाणी एनआयए आणि एटीएसच्या पथकाने छापेमारी करत आहे. यात काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या तरुणांचा दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचा एटीएस आणि NIA ला संशय असून त्यांची चौकशी केली जात आहे.
एनआयए आणि एटीएसची संयुक्त कारवाई
शनिवारी पहाटे एनआयएकडून देशविघातक कार्य करणाऱ्या तरुणांवर देशभर कारवाईची मोहीम उघडण्यात आली आहे. यापूर्वी देखील महाराष्ट्रातील संभाजी नगर, जालना आणि मालेगाव येथे एनआयएने छापेमारी केली होती. दरम्यान, देशभरात अनेक ठिकाणी एनआयए आणि दहशतवाद विरोधी पथक यांची संयुक्त कारवाई सुरू आहे. NIA-ATS Raid in Maharashtra |
छत्रपती संभाजीनगर शहरातील आझाद चौक परिसरामध्ये आणि किराड पुरा भागामध्ये एनआयए तसेच एटीएसने छापेमारी केली. दुसरीकडे नाशिकच्या मालेगाव शहरातील पावरवाडी रोडवरील अब्दुल्लानगर मधील एका डॉक्टरच्या होमिओपॅथी क्लिनिकवर NIA ने छापा टाकला. तसेच मालेगावमध्ये इतरही काही ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे. NIA-ATS Raid in Maharashtra |
तर जालनातील रामनगर चमडा बाजार परिसरात एका संशयिताची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. अटक करण्यात आलेला तरुण चमड्याचा व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. देश विघातक काम करणाऱ्या आणि जम्मू काश्मीरमधील संघटनांशी संबंध असणाऱ्या या तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा:
कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा ; परिसरात शोध मोहीम सुरू





