Taarak mehta : ‘तारक मेहता…’मध्ये मोठा बदल, नव्या अभिनेत्यामुळे जेठालालचा पत्ता होणार कट? वाचा सविस्तर….
मालिकेत नुकतीच एका नव्या राजस्थानी कुटुंबाची एन्ट्री झाली आहे. या कुटुंबात रतन सिंह बिंजोला, त्यांची पत्नी रूपा आणि त्यांची दोन मुलं वीर व बंसरी अशी चार पात्रं आहेत.

Taarak mehta ka ooltah chashmah : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, या मालिकेचा आत्माच मानल्या जाणाऱ्या जेठालाल या पात्राची लोकप्रियता आजही तितकीच कायम आहे.
अभिनेते दिलीप जोशी गेल्या 17 वर्षांहून अधिक काळापासून ही भूमिका साकारत असून त्यांच्या विनोदाची अचूक टायमिंग, हावभाव आणि संवादफेकीने लाखो प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. अशातच, मालिकेत जेठालालचा स्क्रीन टाइम कमी होण्याची चर्चा रंगू लागल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकतेसोबतच चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. (Taarak mehta)

Taarak mehta : ‘तारक मेहता…’मध्ये मोठा बदल, नव्या अभिनेत्यामुळे जेठालालचा पत्ता होणार कट? वाचा सविस्तर….
मालिकेत नुकतीच एका नव्या राजस्थानी कुटुंबाची एन्ट्री झाली आहे. या कुटुंबात रतन सिंह बिंजोला, त्यांची पत्नी रूपा आणि त्यांची दोन मुलं वीर व बंसरी अशी चार पात्रं आहेत. अभिनेते कुलदीप गौर रतन सिंह बिंजोलाची भूमिका साकारत आहेत, तर अभिनेत्री धरती भट्ट त्यांच्या पत्नी रूपाच्या भूमिकेत दिसत आहेत. या नव्या कुटुंबाभोवती सध्या मालिकेतील कथानक अधिक फिरताना दिसत आहे. (Taarak mehta)
गेल्या काही आठवड्यांपासून मालिकेतील अनेक भागांमध्ये या नव्या कुटुंबावर भर देण्यात आला आहे. त्याआधी बाघा आणि बावरी यांच्या प्रेमकथेवर आधारित ट्रॅकही दाखवण्यात आला होता. या काळात जेठालालची उपस्थिती तुलनेने कमी असल्याचं अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावरही नमूद केलं आहे. त्यामुळेच “जेठालालचा ट्रॅक कमी केला जाणार का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Taarak mehta)
काही माध्यमांतील वृत्तांनुसार, निर्माते आगामी भागांमध्ये नव्या पात्रांच्या माध्यमातून कथानकाला वेगळं वळण देण्याचा विचार करत आहेत. त्याचबरोबर दिलीप जोशी महिन्यातील मर्यादित दिवस शूटिंग करतात आणि मालिकेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक असल्याचीही चर्चा आहे.
मात्र, जेठालालची भूमिका कमी करण्याचा किंवा त्यांच्या स्क्रीन टाइममध्ये कपात करण्याचा कोणताही अधिकृत निर्णय झाल्याची पुष्टी अद्याप झालेली नाही. विशेष म्हणजे, या चर्चांवर ना मालिकेचे निर्माता असित कुमार मोदी यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे, ना अभिनेते दिलीप जोशी यांनी यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
2008 पासून सुरू असलेली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका आजही टीआरपीच्या शर्यतीत स्वतःचं स्थान टिकवून आहे. गेल्या अनेक वर्षांत अनेक कलाकार बदलले, नवी पात्रं आली; मात्र जेठालाल हे पात्र आजही या मालिकेचं सर्वात मोठं आकर्षण मानलं जातं. त्यामुळे आगामी काळात कथानकाची दिशा काय असेल आणि जेठालालचा स्क्रीन टाइम खरोखरच कमी होईल का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.





