‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील सोनूच्या लग्नात भिडे गैरहजर; कारण सांगत मागितली माफी

Jheel Mehta Marriage | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही शोमध्ये सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री झील मेहता विवाह बंधनात अडकली आहे. २८ डिसेंबरला तिने बॉयफ्रेंड आदित्य दुबेबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नातील खास क्षणांचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. झीलने तिच्या विवाहासाठी पारंपारिक लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता, तर आदित्यने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. ज्यामुळे दोघेही अतिशय आकर्षक दिसत होते.
झील मेहताने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या संपूर्ण टीमला लग्नाचे आमंत्रण दिले होते. मात्र, या मालिकेत तिच्या वडिलांची भूमिका साकरणाऱ्या ‘आत्माराम भिडे’ अर्थात अभिनेता मंदार चांदवडकर याला लग्नाला उपस्थित राहता आले नाही. याबद्दल त्यांनी सोनूची माफी मागितली. शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने या लग्नाला उपस्थित राहता आले नसल्याचे सांगितले. मात्र त्यांनी झीलला खूप शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
अभिनेत्री झील मेहता गेल्या १४ वर्षांपासून आदित्य दुबेला डेट करत होती. अखेर वर्षाच्या अखेरीस दोघांनी लग्न केले. या लग्नाला कुटुंबीय आणि काही खास मित्र मंडळी उपस्थित होती. ग्रँड फंक्शनमध्ये दोघांनी एकमेकांसोबत सात फेरे घेतले.
दरम्यान, झील मेहताने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘सोनू भिडे’ ही भूमिका साकारली होती. मात्र, नंतर तिने करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा:
बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई; व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज





