गुजरातमध्ये जगन्नाथ रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना; बाल्कनी कोसळल्याने 11 जण…

नवी दिल्ली – गुजरातमधील दरियापूरमध्ये भगवान जगन्नाथ रथयात्रेदरम्यान एक अपघात झाला आहे. रथयात्रेदरम्यान एका इमारतीची बाल्कनी कोसळली असून, त्यात सुमारे 11 जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रथयात्रेच्या मार्गावरील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीचा काही भाग कोसळला.
यावेळी अनेक लोक भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी खाली उभे होते. बाल्कनीचा काही भाग भाविकांच्या अंगावर पडल्याने मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत तीन मुलांसह 11 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर रथयात्रा मार्गावरील सर्व धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींना अहमदाबाद महापालिकेने नोटीस द्यावी, असे सांगण्यात येत आहे. कडियानाकाजवळ ज्या इमारतीत अपघात झाला ती इमारतही जीर्ण अवस्थेत होती. मात्र, याप्रकरणी प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली होती की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Big accident during Rath Yatra in Ahmedabad many people injured due to breaking of balcony of a house during Rath Yatra #BREAKING @sanghaviharsh pic.twitter.com/EwtNBZiXNE
— Vinay Tiwari (@vinaytiwari9697) June 20, 2023
दरम्यान, अचानक तो स्लॅबवरून खाली पडला असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या 11 जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. सर्वांना किरकोळ दुखापत झाली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
रथयात्रेदरम्यान आजूबाजूच्या लोकांना ट्रकमधून प्रसाद वाटप करण्यात येत असताना ही घटना घडल्याचा दावाही केला जात आहे. लोक प्रसाद घेण्यासाठी खाली उतरले तेव्हा बाल्कनी पडली आणि अनेकांना त्याचा फटका बसल्याचे स्थानिक लोक सांगतात. मात्र, या घटनेनंतर भगवान जगन्नाथ रथयात्रा कोणत्याही अडथळ्याविना सुरू आहे.





