Maine Pyar Kiya : ‘मैने प्यार किया’ सिनेमासाठी ‘भाग्यश्री’ नाही तर ‘ही’ अभिनेत्री होती पहिली पसंत; अशी गेली हातातून मोठी ऑफर !

Bhagyashree | Upasana Singh | Maine Pyar Kiya : ‘राजकुमारी भाग्यश्री राजे पटवर्धन’ म्हणजेच अभिनेत्री ‘भाग्यश्री’ सांगलीचे राजा श्रीमंत विजयसिंहराव माधवराव पटवर्धन यांची ती मुलगी. पण या अभिनेत्रीला सर्वजण ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील सुस्वभावी आणि संस्कारी मुलगी म्ह्णून आज ही ओळखतात. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री ‘भाग्यश्री’ने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली होती. भाग्यश्रीने आजही प्रेक्षकांच्या मनात आपली जागा तशीच कायम ठेवली आहे.
अभिनेत्री भाग्यश्री बद्दल बोलायचे झाल्यास तिने ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. यानंतर ती ‘त्यागी’, ‘जन-जाम का साथ’, ‘देवा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे, तर आता ती तेलुगू हिंदी चित्रपट ‘राधे श्याम’मध्ये दिसली आहे.
‘मैने प्यार किया’ चित्रपटात भाग्यश्री सोबत अभिनेता सलमान खान मुख्य भूमिकेत झळकला होता. या चित्रपटाला तीन दशके होऊन देखील हा चित्रपट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. सलमान खानच्या कारकिर्दीतील हा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट होता. ज्यामध्ये त्याने मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती.
या चित्रपटात सलमान खानची नायिका निवडण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बड़जात्या यांनी अनेक अभिनेत्रींच्या ऑडिशन घेतल्या होत्या. मात्र, अंतिम फेरीत ‘भाग्यश्री’ची निवड करण्यात आली होती. असं अभिनेत्री ‘उपासना सिंग’ने सांगितलं आहे. नुकतंच अभिनेत्रीने स्वतः याबद्दल खुलासा केला आहे.
उपासना सिंगने सांगितेल की, जेव्हा ती पहिल्यांदा मुंबईत आली तेव्हा तिने सूरज बड़जात्या यांना भेटली. त्यांनी मला चित्रपटाबद्दल आणि माझ्या भूमिकेबद्दल सर्व काही सांगितले आणि त्यांनी ‘मैने प्यार किया’ चित्रपटासाठी माझी निवड केली.
त्यानंतर सूरज बड़जात्या यांनी तिल्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या वडिलांना भेटण्यास सांगितले. त्यानंतर उपासना सिंग दुसऱ्या दिवशी त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी आली तेव्हा त्यांनी तिला नकार दिला. त्यानंतर त्यांनी मला पुन्हा कॉल केला नाही.
मात्र, ते एका नायिकेच्या शोधात होते, जी सलमानपेक्षा खूपच लहान असेल. बडजात्या यांनी माझी उंची जास्त असल्यामुळे नकार दिला होता. त्यांना सलमानपेक्षा थोडी लहान असलेली नायिका हवी होती, म्हणून त्यांनी मला कास्ट केले नाही. माझ्या जागी त्यांनी भाग्यश्रीला घेतले. असं उपासना सिंगने यावेळी सांगितलं.
‘मैने प्यार किया’ सिनेमावर एक नजर….
‘मैने प्यार किया’ हा चित्रपट 29 डिसेंबर 1989 रोजी प्रदर्शित झाला. सूरज बडजात्या दिग्दर्शित हा पहिला चित्रपट होता. मुख्य अभिनेता म्हणून सलमानचा हा पहिलाच चित्रपट होता आणि या चित्रपटातून भाग्यश्रीने अभिनयात पदार्पण केले होते. या चित्रपटातील संवाद आणि गाणी आजही संस्मरणीय आहेत. “दोस्ती का एक असल है मॅडम, नो सॉरी, नो थँक्यू” सारख्या डायलॉग्समुळे त्याची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे.
तसेच, ‘मैने प्यार किया’ची जवळपास सर्वच गाणी आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. ज्यात ‘कबूतर जा जा’, ‘दिल दीवाना’, ‘आजा शाम होने आयी’ आणि ‘आते जाते हंस्ते गाते’ या गाण्यांचा समावेश आहे. तिकीट बारीवर या सिनेमाने तुफान कमाई केली होती. सिनेमाची कथा आणि गाणी आज देखील लोकप्रिय आहेत.





