Mahua Moitra: महागड्या बॅगवरून ट्रोल झालेल्या महुआ मोईत्रांचे ट्रोलर्सला प्रत्युत्तर, म्हणाल्या… “झोला लेके आए थे..’

नवी दिल्ली – संसदेत महागाईवर झालेल्या चर्चेदरम्यान महागडी बॅग लपवताना कॅमेऱ्यात कैद झालेल्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर टीका होत आहे. इतकी महागडी बॅग असल्याने त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. या टीकेच्या दरम्यान महुआ यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका जुन्या विधानाच्या आठवणीही ताज्या केल्या.
महुआ यांनी ट्विट करून म्हंटले की, ‘2019 पासून संसदेत झोलेवाला फकीर. झोला घेऊन आले, झोला घेऊन जाणार.’ या ट्विटसोबत महुआने फोटोंचा कोलाजही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्या त्यांच्या हँडबॅगसोबत दिसत आहे. 2016 मध्ये पीएम नरेंद्र मोदींचे विधान खूप प्रसिद्ध झाले होते ज्यात त्यांनी म्हटले होते की, मी फकीर आहे, झोला घेऊन चालला जाणार.
As the issue of “mehengai” is raised, somebody’s Louis Vuitton bag quickly slides under the bench. pic.twitter.com/Rtra8qsBEt
— Ajit Datta (@ajitdatta) August 1, 2022
मात्र, महुआंच्या या स्पष्टीकरणावरही सोशल मीडिया यूजर्सनी त्यांना ट्रोल करणे सुरूच ठेवले. दीपक कुमार या युजरने सांगितले की, जर दीड लाखांची बॅग मॅडम घेऊन जात असेल तर त्यांच्याकडे किती मालमत्ता असेल. अभिनव गुप्ता म्हणाले, अशी बॅग देवाने प्रत्येकाला द्यावी.
बॅग लपवताना दिसल्या महुआ –
सोमवारी लोकसभेत महागाई, जीएसटी आणि उत्पादनांच्या वाढत्या किमतींवर चर्चा झाली. यादरम्यान, एका व्हिडीओत दिसत आहे की, महुआ यांच्या शेजारी बसलेल्या टीएमसी खासदार काकोली घोष दस्तीदार बोलण्यासाठी उठतात. महुआ त्यांची बॅग उचलून खाली ठेवतात. या व्हिडिओमध्ये काकोली महागाईवर चर्चा करताना दिसत आहेत. त्यांचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे, त्यानंतर युजर्सनी त्यांना जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली. महुआंच्या बॅगेची किंमत दीड लाख रुपये असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. म्हणूनच त्या त्यांची बॅग लपवत होत्या. लुई व्हिटॉन ब्रँडची ही बॅग असल्याचे सांगण्यात येत आहे.





