Mahindra Thar ROXX: भारतीय बाजारात 2024 मध्ये अनेक कार्स लाँच झाल्या आहेत. नवीन टाटा कर्व्ह, मारुती डिझायरपासून ते मर्सिडिज-बेंझ ई-क्लाससह अनेक कारने भारतीय बाजारात एंट्री केली आहे. गेल्यावर्षी लाँच झालेल्या या गाड्यांना आता इंडियन कार ऑफ द इयर, इंडियन ग्रीन कार ऑफ द इयर आणि प्रीमियम कार ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे. महिंद्रा थार रॉक्स ही वर्षातील सर्वात लोकप्रिय कार ठरली असून, या गाडीला इंडियन कार ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे. मारुती डिझायर, मारुती स्विफ्ट, महिंद्रा थार रॉक्स, एमजी विंडसर ईव्ही, सिट्रोएन बेसाल्ट, टाटा कर्व्ह आणि कर्व्ह ईव्ही, टाटा पंच ईव्ही आणि BYD eMAX 7 या गाड्यांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यात महिंद्रा थार रॉक्सने बाजी मारली. Mahindra Thar ROXX चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स Mahindra Thar ROXX च्या इंटेरियरबद्दल सांगायचे तर यामध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, पुश बटन स्टार्टसह कीलेस एंट्री, रियर वेंट्ससह मॅन्युअल एसी, हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, USB-C चार्जिंग पोर्ट आणि 60:40 स्प्लिट रियर सीट फंक्शनलिटी दिली आहे. सुरक्षेसाठी यामध्ये 6 एअरबॅग्स (स्टँडर्ड), रियर पार्किंग सेंसर, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि सर्व पॅसेंजर्ससाठी 3-पॉइंट सीटबेल्ट देण्यात आले आहे. महिंद्रा थार रॉक्सचे MX1 बेस व्हेरिएंट 2.0-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह येते, जे 162hp मॅक्सिमम पॉवर आणि 330Nm मॅक्सिमम टॉर्क जनरेट करते. याशिवाय, यात डिझेल इंजिनचा देखील पर्याय मिळेल. कारमध्ये 2.2-लिटर डिझेल इंजिन दिले असून, हे 152hp मॅक्सिमम पॉवर आणि 330Nm मॅक्सिमम टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिन मॅन्युअल ट्रांसमिशनसह येतात. महिंद्राची ही कार MX1, MX3, MX5, AX3L, AX5L आणि AX7L या 6 व्हेरिएंटमध्ये येते. कारची किंमत 12.99 लाख रुपयांपासून ते 22.49 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे.