Mahesh Shinde : आमदार महेश शिंदेंच्या उपस्थितीत कोरेगावात दीपोत्सव ; केदारेश्वर मंदिर दिव्यांनी लखलखले

प्रभात वृत्तसेवा
कोरेगाव – सद्गुरू रमणगिरी महाराजांच्या 39 व्या पुण्यस्मरणानिमित्त कोरेगाव येथील श्री केदारेश्वर मंदिरात सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवाने संपूर्ण मंदिर परिसर लखलखला होता.आमदार महेश शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व माजी नगरसेवक राजेंद्र बर्गे,
खरेदी-विक्री संघाचे संचालक उदयसिंह बर्गे, बाजार समितीचे संचालक संजय बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल बर्गे, माजी नगरसेवक प्रीतम शहा, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बर्गे, संतोष बर्गे, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व भाविकांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा गजर करण्यात आला. पारायण सोहळ्याचे प्रमुख ह. भ. प. शिवाजी महाराज शिंदे गोडसेवाडीकर यांनी उपक्रमाबद्दल माहिती दिली. पारायण सोहळ्यातील सहभागी महिलांना आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते साड्यांचे वितरण करण्यात आले.





