पिंपरी | भोसरीतून महेश लांडगे तर चिंचवडमधून शंकर जगतापांना उमेदवारी

पिंपरी, (प्रतिनिधी) – भाजपने विधानसभा निवडणुकीकरिता 99 उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली आहे. यामध्ये भोसरी विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार मेहश लांडगे यांना तर चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी दिली आहे.
यामुळे भोसरीतून महेश लांडगे तर चिंचवडमधून शंकर जगताप हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत. पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत भोसरी, पिंपरी व चिंचवड या तीन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे.
यापैकी भोसरीचे प्रतिनिधित्व आमदार महेश लांडगे तर चिंचवड विधानसभेचे प्रतिनिधित्व अश्विनी जागताप या करीत आहेत.
राज्याची सार्वत्रिक विधानसभा निवडणूक जाहिर होण्यापुर्वीच यापैकी चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपमधून लढण्यासाठी इच्छूक असलेल्यांची संख्या जास्त असल्याने या मतदार संघातून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यानच्या काळात आमदार अश्विनी जगताप यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत, उमेेदवारीहून जगताप कुटुंबियांमध्ये कोणतेही मतभेद नसून, शंकर जगताप यांना विधानसभेसाठी संधी द्यावी, अशी मागणी केली होती.
या या पार्श्वभूमीवर चिंचवडमधील इच्छूकांचे भाजपमधील राजकीय घडामोडींवर बारिक लक्ष होते. अनेक जण वरिष्ठांपर्यंत पोहोचले होते, तर अनेकमाणी अन्य पक्षाच्या पर्यायाचीदेखील चाचपणी सुरू केली होती.
मात्र, चिंचवडमधून शंकर जगताप यांना उमेदवारी जाहिर झाल्यानंतर आता हे नाराज कोणती भूमिका घेताहेत, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
उपमुख्यमत्रीं देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले विद्यमान आमदार महेश लांडगे यांना भोसरी विधानसभा मतदार संघातून पुन्हा एकदा उमेदवारी जाहिर झाली आहे.
या मतदार संघावर त्यांची चांगली पकड असल्याने या मतदार संघात भाजपकडून फारसे कोणी इच्छूक नसल्याचे चित्र पहायला मिळाले.
भोसरी मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
तर भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाल्याने शहरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उमेदवारी जाहिर करण्यात भाजपची आघाडी
या दोन्ही मतदार संघांमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपने जागा वाटपाबरोबरच उमेदवारांची पहिली यादी जाहिर करत आघाडी घेतली आहे.
यामध्ये महायुतीच्या जागा वाटपात भाजपच्या वाट्याला आलेल्या भसोरी व चिंचवड मतदार संघातील उमेदवारांनी भाजपच्या पहिल्या यादीत स्थान मिळविले आहे.
मधील घटक पक्ष असलेल्या भाजपने जागा वाटपाबरोबरच उमेदवारांची पहिली यादी जाहिर करत आघाडी घेतली आहे.




