Satara : मायणी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेश जाधव

मायणी : मायणी, ता. खटाव पत्रकार संघाची बैठक खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश सुरमुख यांचे अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये आगामी २०२५ सालासाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी महेश जाधव यांची अध्यक्ष म्हणून सर्वांनुमते निवड करण्यात आली.
यावेळी सर्वानुमते पुढील प्रमाणे नूतन कार्यकारणी निवडण्यात आली. उपाध्यक्ष- इम्रान जमादार, कार्याध्यक्ष- महेश तांबवेकर, सचिव – तानाजी चव्हाण, खजिनदार- मारुती पवार, मार्गदर्शक- प्रकाश सुरमुख व संजय जगताप यांचा समावेश आहे.
अध्यक्षपदाच्या निवडीनंतर अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, सर्वांनी माझ्यावर अध्यक्षपदाची जी जबाबदारी टाकली आहे ती निश्चितपणाने सर्वांना बरोबर घेऊन यशस्वीरित्या पार पाडू. आगामी वर्षात पत्रकार संघातर्फे समाज हिताचे विविध उपक्रम राबविण्यात येतील.
बैठकीस प्रकाश सुरमुख, संजय जगताप, तानाजी चव्हाण , मारुती पवार, महेश जाधव, महेश तांबवेकर ,इम्रान जमादार आदी पत्रकार उपस्थित होते. नूतन कार्यकारीणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.





