महेश बाबूचा नवा लुक; आगामी चित्रपटात दिसणार हटके अंदाजात?

Mahesh Babu Look | साऊथचा सुपरस्टार महेश बाबूचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या आगामी चित्रपटाची चाहतेही आतुरतेने वाट पाहत असतात. एसएस राजामौली आणि महेश बाबू यांच्या SSMB29 या चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून काही वृत्त समोर येत आहेत. यादरम्यान महेश बाबू याचा एक लुक समोर आला आहे. त्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी हा लुक केल्याचे म्हंटले आहे.
महेश बाबूने आपल्या नव्या लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. अलीकडेच, अभिनेता आणि त्याच्या पत्नीने अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना 50 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी, सुपरस्टार दाढी आणि लांब केस असलेल्या लूकमध्ये दिसला, ज्याबद्दल लोकांनी आता वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. Mahesh Babu Look |
Superstar @urstrulyMahesh and his wife #Namrata have donated ₹50 lakhs to the Chief Minister’s Relief Fund and presented the check to CM @revanth_anumula at his Jubilee Hills residence. Additionally, Mahesh Babu donated another ₹10 lakhs on behalf of AMB. ❤️ @TelanganaCMO pic.twitter.com/T5rK0xS9Gr
— 𝐕𝐚𝐦𝐬𝐢𝐒𝐡𝐞𝐤𝐚𝐫 (@UrsVamsiShekar) September 23, 2024
महेश बाबू यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेऊन ५० लाखांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी महेश बाबू दाढी, वाढलेल्या मिशा आणि लांब केसांसह दिसत आहेत. बऱ्याच काळानंतर महेश या लूकमध्ये दिसला आहे. Mahesh Babu Look |
अभिनेत्याचा हा लूक सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे. काही चाहत्यांना त्याचा नवा लूक खूप आवडला आहे तर काहींंनी त्याच्या लूकवर मीम्स बनवत आहेत. याशिवाय अनेकांनी त्याच्या लूकची प्रशंसा केली आहे.





