Mahayuti : महायुतीचा नवा फॉर्म्युला! 6 बड्या नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी
mahayuti : या समितीत तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी दोन अनुभवी आणि प्रभावी नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

mahayuti : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी महायुतीमध्ये अधिक सुसूत्रता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून उच्चस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील समन्वय मजबूत करण्यासाठी ही समिती काम करणार आहे.
या समितीत तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी दोन अनुभवी आणि प्रभावी नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंत आणि दादा भुसे यांना स्थान देण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ हे समितीचे सदस्य असतील.
या समितीच्या रचनेत एक विशेष बाब म्हणजे निर्णयक्षम आणि प्रत्यक्ष सत्तेतील नेत्यांनाच प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपचे रविंद्र चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना समितीबाहेर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान आणि प्रभावी करण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
ही असणार उद्दिष्टे (Mahayuti )
महायुतीतील जागावाटपाचे वाद स्थानिक पातळीवर सोडवणे, मंत्र्यांमधील आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय वाढवणे, सरकारी योजनांचा संयुक्त प्रचार करणे आणि विरोधकांच्या टीकेला एकत्रितपणे उत्तर देणे, ही या समितीची प्रमुख उद्दिष्टे असणार आहेत. विशेषतः ‘लाडकी बहीण’ योजनेसारख्या महत्त्वाच्या योजनांवरून होणारा ‘क्रेडिट वॉर’ थांबवण्यावरही समितीचा भर असेल.
Mahayuti : महायुतीचा नवा फॉर्म्युला! 6 बड्या नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी
समितीची बैठक दर १५ दिवसांनी किंवा गरजेनुसार तातडीने घेतली जाणार आहे. स्थानिक स्तरावरील वादांमध्ये मध्यस्थी करून प्रशासकीय अडथळे दूर करणे आणि विकासकामांना गती देणे, अशीही जबाबदारी या समितीवर असेल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री समितीच्या अहवालावर अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महायुती सरकारमध्ये सध्या काही मुद्द्यांवरून निर्माण झालेला तणाव कमी करून जनतेसमोर एकजूट दाखवण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मानले जात आहे.





