Mahayuti Candidate List : महायुतीचं टेन्शन वाढलं ! ‘या’ जागांवर बंडखोरीचा धोका
निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) अंतर्गत कलह आणि बंडखोरी (Mahayuti Candidate List) उघडपणे चव्हाट्यावर आली आहे.

Mahayuti Candidate List : राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) अंतर्गत कलह आणि बंडखोरी (Mahayuti Candidate List) उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. अनेक स्थानिक नेत्यांनी पक्षादेश धुडकावून आपले अपक्ष किंवा बंडखोर उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे वरिष्ठ नेत्यांची झोप उडाली आहे.
महायुतीसमोर आता सर्वात मोठे आव्हान या बंडखोर उमेदवारांची (Mahayuti Candidate List) मनधरणी करण्याचे आणि त्यांना अर्ज मागे घ्यायला लावण्याचे आहे. छत्रपती संभाजीनगर, रायगड, यवतमाळसह अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांत हीच बिकट परिस्थिती पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये नेमकी कुठे आणि कोणी बंडखोरी केली आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
महायुतीमध्ये कुठे कुठे बंडखोरी?
1)रायगडमध्ये राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरेंना उमेदवारी,महेंद्र दळवींची मुलगी जुईली दळवींची बंडखोरी
2)संभाजीनगर-जालना-भाजपकडून सुहास शिरसाठ यांना उमेदवारी,आ.अब्दुल सत्तार यांचे पुत्र समिर सत्तारांची बंडखोरी
3)यवतमाळ-शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदींना उमेदवारी,तर भाजपचे नितिन भुतडा, राष्ट्रवादीकडून साजिद बेग यांची बंडखोरी
4)पुण्यात राष्ट्रवादीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी,भाजपचे प्रदिप कंद यांच्याकडून बंडखोरी
5)अमरावतीत भाजपकडून प्रविण पोटेंना उमेदवारी,शिवसेनेचे विप्लव बाजोरीयांची बंडखोरी
6)नाशिक -शिवसेनेकडून नरेंद्र दराडेंना उमेदवारी,अपक्ष गोकूळ गिते,गणेश गितेंचा अर्ज,महाजनांचे निकटवर्तीय
7)परभणी-शिवसेनेकडून सईदा खान यांना उमेदवारी,राष्ट्रवादीकडून विजय जामकर आणि जिल्हा परिषद सदस्य संग्राम जामकरांची बंडखोरी
8)नांदेड-भाजपकडून अमरनाथ राजूरकरांना उमेदवारी,राष्ट्रवादीचे प्रविण पाटील चिखलीकरांची बंडखोरी (आमदार चिखलीकरांचा मुलगा)
9)जळगाव-भाजपकडून नंदकिशोर महाजनांना उमेदारी,तर शिवसेनेचे रेश्मा काळे,दिपक धांडेची बंडखोरी






