‘मविआ’चा मुंबईत 36 जागांसाठी फॉर्म्युला ठरला? यादी आली समोर

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये बैठका सुरु झाल्या आहेत. कोणत्या जागांवर कोण लढणार यावर त्यांची चर्चा सुरु आहे.आता महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये मुंबईमधील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरल्याचे समजत आहे. विशेष म्हणजे कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष आग्रही आहे याची यादी आता समोर आली आहे.
कोणता पक्ष किती जागांसाठी आग्रही
मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. त्यापैकी 20 जाग लढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे. त्याखालोखाल 18 जागांवर काँग्रेस दावा सांगत असून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकूण 7 जागांवर आग्रही असल्याचे समजत आहे. तसेच समाजवादी पार्टीला शिवाजीनगर-मानखूर्दची जागा सोडण्यात येणार असल्याचे समजत आहे.
ठाकरेंची शिवसेना आग्रही असलेल्या 20 जागा कोणत्या?
शिवडी
भायखळा
वरळी
माहीम
चेंबूर
भांडुप पश्चिम
विक्रोळी
मागाठाणे
जोगेश्वरी पूर्व
दिंडोशी
अंधेरी पूर्व
कुर्ला
कलिना
वांद्रे पूर्व
दहिसर
वडाळा
घाटकोपर पश्चिम
गोरेगाव
अणुशक्ती नगर
वर्सोवा
काँग्रेस आग्रही असलेल्या मुंबईतील 18 जागा कोणत्या?
धारावी
चांदिवली
मुंबादेवी
मालाड पश्चिम
सायन कोळीवाडा
कुलाबा
कांदिवली पूर्व
अंधेरी पश्चिम
वर्सोवा
वांद्रे पश्चिम
घाटकोपर पश्चिम
कुर्ला
भायखळा
जोगेश्वरी पूर्व
मलबार हील
माहीम
बोरीवली
चारकोप
शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही असलेल्या मुंबईतील 7 जागा कोणत्या?
अणुशक्ती नगर
घाटकोपर पूर्व
घाटकोपर पश्चिम
वर्सोवा
कुर्ला
अंधेरी पश्चिम
दहिसर
समाजवादी पक्षासाठी सोडली जाणारी जागा
शिवाजीनगर-मानखुर्द





