पुणे जिल्हा | वाल्ह्यात महाविकास आघाडीचा जल्लोष

वाल्हे, (वार्ताहर) – बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा एक लाखापेक्षा अधिक फरकाने विजयी झाला. त्यानंतर वाल्हे (ता. पुरंदर) सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला, रॅली काढून त्यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांसह, कॉग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांनी वाल्हे गावठाणातील सिध्दार्थनगरपासून गांधी चौकापर्यंत फटाके फोडून, गुलालाची मुक्त उधळण करीत, विजयाची रॅली काढली.
दरम्यान, मुख्य बाजारपेठेतून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून सुप्रिया सुळे यांच्या विजयाबद्दल गुलालाची मुक्त उधळण करीत, जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी पवार गटाचे सागर भुजबळ, हनुमंत पवार, दीपक पवार, साईनाथ चव्हाण, धनंजय भुजबळ, पांडुरंग भुजबळ, निखिल पवार तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे गिरीश पवार,
हरिष दुबळे, सतीश पवार, सचिन जाधव, सचिन पवार काँग्रेसचे उद्योजक राजेंद्र पवार, मदन भुजबळ, बाळासाहेब भुजबळ, तसेच ड. फत्तेसिंग पवार, रणसिंग पवार, राजन पवार, जगदीश पवार यांसह आदी अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.





