Mahaveer Karna Film: ‘महावीर कर्ण’ चित्रपटाची घोषणा; प्रसिद्ध अभिनेता पहिल्यांदाच दिसणार ऐतिहासिक भूमिकेत
Mahaveer Karna Film: पडद्यावर ही भूमिका साकारणं अभिनेत्यासाठीही एक मोठे पाऊल मानले जातयं

Mahaveer Karna Film: नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘रामायण’मध्ये अभिनेता रणबीर कपूर भगवान रामांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची सध्या अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. याचदरम्यान, आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून ‘महावीर कर्ण’ नावाच्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. सुपरस्टार राघव लॉरेंस ‘महावीर कर्ण’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.
नुकतीच राघव लॉरेन्सच्या आगामी ‘महावीर कर्ण’ या चित्रपटाची पहिली झलक दाखवण्यात आली. चित्रपटातील त्याच्या या लूकला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. ‘पेन मूव्हीज’ प्रॉडक्शन हाऊसने आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केली आहे. (Mahaveer Karna Film)
View this post on Instagram
सोबतच पोस्टमध्ये म्हंटले की, ‘एक चेहरा. एक महान व्यक्ती, एक योद्धा. महावीर कर्णच्या रूपातील राघव लॉरेंसचा फर्स्ट लूक.’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता राघव लॉरेन्स त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच एका पौराणिक आणि ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. (Mahaveer Karna Film)
कर्ण हा असा योद्धा आहे जो त्याच्या अढळ निष्ठा, दानशूरपणा, सन्मान आणि महान त्यागासाठी ओळखला जातो. त्यामुळे पडद्यावर ही भूमिका साकारणे अभिनेत्यासाठीही एक खूप मोठे पाऊल मानले जात आहे. (Mahaveer Karna Film)
या चित्रपटाचे एकूण बजेट सुमारे १५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट तमिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नड अशा एकूण पाच प्रमुख भाषांमध्येपॅन इंडिया स्वरुपात बनवला जात आहे. ‘महावीर कर्ण’ चित्रपट पुढील वर्षापर्यंत चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकतो. Mahaveer Karna Film
हेही वाचा :





