‘सत्यशोधक’ मधून उलगडणार महात्मा फुलेंचा जीवनपट  

मुंबई: सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहत असल्याचे दिसून येत आहे. आणि हाच प्रवाह आता मराठी चित्रपटसृष्टीकडे वळला आहे. लवकरच ‘सत्यशोधक’या बायोपिकमधून ‘महात्मा फुलेंचा’ जीवनपट उलगडणार आहे.

या चित्रपटासाठी अभिनेता संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. संदीप कुलकर्णी महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका वठविणार आहे. तर राजश्री देशपांडे सावित्रीबाई फुले यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. हा चित्रपट या वर्षाअखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निलेश जळमकर दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ या चित्रपटाची निर्मिती समता प्रॉडक्शन आणि कथाकार एंटरटेन्मेंटनं केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.