Wagholi News : महसूल यंत्रणा पोहोचणार प्रत्येक गावापर्यंत; लोणीकंदमध्ये ‘महसूल समाधान शिबिरा’ला बावनकुळे यांची भेट
Wagholi News : पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Wagholi News : महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचा लाभ नागरिकांना सुलभ पद्धतीने एकाच छताखाली मिळावा, आणि या निमित्ताने महसूल यंत्रणा प्रत्येक गावापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने राज्यभर या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. (Wagholi News)
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील लोणीकंद, (ता. हवेली) येथे आयोजित शिबिराला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली. यावेळी महसुल मंत्री बोलत होते.
यावेळी उपस्थितांशी महसूल मंत्र्यांनी संवाद साधला, तसेच महसूल विभागाच्या विविध योजनांतील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि साहित्याचे वितरण केले. (Wagholi News)
यावेळी लोणीकंद ग्रामपंचायतच्या सरपंच सुप्रियाताई कंद, उपसरपंच सोनालीताई जगताप, भाजप पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद, नगरसेवक रामभाऊ दाभाडे, नगरसेविका रत्नमालाताई सातव, नगरसेवक अनिल सातव, स्वातीताई चांदुरकर, दीपाली गव्हाणे, राजेंद्र गावडे, हवेली पंचायत समिती सभापती युवराज काकडे,
हवेली पंचायत समिती सदस्य मोनिकाताई कंद, राणीताई वाळके, सुदर्शन चौधरी, कुशाल सातव, मनीषाताई पाचंगे, माजी जि. प. सदस्य शेखर पाचुंदकर, शंकर भूमकर, क्रीडा संयोजक संदीप भोंडवे, माजी सभापती नारायण कंद, जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सभापती जितेंद्र बडेकर,
राहुल पाचर्णे, रोहिदास उंद्रे, उपाध्यक्ष पूनमताई चौधरी, जिल्हा सरचिटणीस प्रियाताई पवार, श्रीकृष्ण देशमुख, संजीवनीताई कापरे, माऊली वाळके, सुनील भेंगडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, तहसीलदार तृप्ती कोलते, तहसीलदार अमोल कदम, उपविभागीय अधिकारी शेखर शेलार, कृषी अधिकारी अमित रणवरे तसेच अन्य मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते. (Wagholi News)



