National Games 2023 (Men’s water polo) : महाराष्ट्राचा संघ 26 वर्षांनी अंतिम फेरीत…

पणजी : महाराष्ट्र संघाने पश्चिम बंगाल संघावर 16-4 असा दणदणीत विजय नोंदवला आणि वॉटरपोलोमधील पुरुष गटात अंतिम फेरी गाठली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तब्बल 26 वर्षांनी महाराष्ट्र संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. महाराष्ट्राच्या महिला संघाला मात्र उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांना आता कांस्यपदकासाठी खेळावे लागणार आहे.
पुरुषांच्या उपांत्य फेरीत अरुण मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच पश्चिम बंगाल विरुद्ध वर्चस्व गाजवले. महाराष्ट्रकडून सारंग वैद्य व उदय उत्तेकर यांनी प्रत्येकी चार गोल केले तर गौरव महाजनी व पियुष सूर्यवंशी यांनी प्रत्येकी दोन गोलांची नोंद केली. अंतिम फेरीत महाराष्ट्रास सेनादल संघाबरोबर खेळावे लागणार आहे. महिलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राला केरळ संघाने 16-7 से सहज पराभूत केले.
Resurfacing Glory! 🤽♂️
After a remarkable 26-year journey, Maharashtra's men's water polo team has stormed into the finals at the national sports competition.@Nat_Games_Goa @BansodeSpeaks#TeamMaharashtra #JayMaharashtra #goforgoa #goforgold #getsetgoa #NationalGames2023 pic.twitter.com/lOXDU7DZcS— Maharashtra Olympic Association (@MahaOlympic) November 3, 2023
शनिवारी सकाळी होणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्राची कर्नाटक संघाची गाठ पडणार आहे. त्यानंतर पुरुष गटाचा अंतिम सामना होणार आहे.





