‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीम सिंगापूरमध्ये; वनिता खरातने शेअर केला व्हिडिओ

Maharashtrachi Hasya Jatra Fame Vanita Kharat| ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. यातील कलाकारांना देखील या शोमुळे वेगळी ओळख मिळाली आहे. अभिनेत्री वनिता खरात देखील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे घराघरात पोहचली. तिच्या विनोदी शैलीने ते प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे. या मालिकेचे शो परदेशातही होत आहेत. नुकतेच वनिताने सोशल मीडियावर सिंगापूरमधील शोदरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यानंतर नेटकऱ्यांनी देखील या टीमचे कौतुक केले आहे. Maharashtrachi Hasya Jatra Fame Vanita Kharat|
View this post on Instagram
आता या टीमचे कलाकार सिंगापूरमध्ये पोहचले आहे. तिथे या कलाकारांचा लाईव्ह शो पार पडला आहे. येथे देखील या शोला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. सिंगापूर आधी हास्यजत्रेची संपूर्ण टीम अमेरिका, ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती. Maharashtrachi Hasya Jatra Fame Vanita Kharat|
वनिता खरातने व्हिडीओ शेअर करत ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा या कार्यक्रमाला आता फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळते आणि आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे, Thank You Singapore इतके प्रेम दिल्याबद्दल’, असं कॅप्शन दिले आहे.
वनिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा टिमचे प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, समीर चौघुले, नम्रता संभेराव हे अभिनय सादर करताना दिसत आहे. सिंगापूर येथील या कार्यक्रमाला प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसत आहे. Maharashtrachi Hasya Jatra Fame Vanita Kharat|
हेही वाचा:
साऊथचा सुपरस्टार राम चरणने स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटासाठी घेतली भरमसाठ ‘फी’





