Maharashtra Winter Session: 8 ते 14 डिसेंबर हिवाळी अधिवेशन, यावर्षी फक्त एक आठवडा
Updated On:

Maharashtra Winter Session: राज्य विधिमंडळाचे बहुप्रतिक्षित हिवाळी अधिवेशन येत्या 8 ते 14 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, यंदाचे अधिवेशन केवळ सात दिवसांचे असणार आहे. विशेष म्हणजे, या अल्पकालावधीच्या अधिवेशनात रविवारी देखील कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.





