Maharashtra Winter Session । राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी मंत्र्यांना कोणत्या खात्याची जबाबदारी देण्यात येणार आहे हे अजूनही स्पष्ट करण्यात आले नाही. त्यातच आज हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आजच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे आज भेट घेणार असून खातेवाटपासंबंधी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज या तिघांच्या भेटीनंतर मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. मंत्रीपद न मिळाल्याने महायुतीच्या अनेक आमदारांमध्ये अगोदरच नाराजी आहे त्यातच जर ऐन अधिवेशनात खातेवाटप झाले तर आणखी नाराजी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावध पवित्रा घेतला असल्याचे म्हटले जात आहे. नाराजांना प्रतिक्रियेला वेळ मिळणार नाही Maharashtra Winter Session । राज्याचे अधिवेशन संपल्यावर म्हणजेच आज 21 डिसेंबर किंवा 22 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खातेवाटपाचे पत्र राजभवनला पाठवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर 23 डिसेंबरला मंत्री संभाव्य विभागाचा पदभार घेण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर नाराजांना प्रतिक्रियेला वेळ मिळू नये असे त्यामागचे गणित असल्याचे म्हटले जात आहे. आमदारांमध्ये नाराजी Maharashtra Winter Session । विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन परंपरेने विदर्भात पार पडते. मात्र, विदर्भ करारानुसार सहा आठवड्यांचे अपेक्षित असलेले हिवाळी अधिवेशन आता फक्त एक आठवड्यात पुरते मर्यादित झाले आहे. त्यामुळे विदर्भातील आमदारांमध्ये नाराजी आणि निराशेची भावना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी होत असून तो सध्या दोन ते तीन आठवड्यापर्यंत मर्यादित होता. यंदा मात्र नुकतेच सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या काळात अवघ्या एक आठवडाचा हिवाळी अधिवेशन नागपुरात झाल्याने विदर्भातील विविध मुद्द्यांना अधिवेशनात अपेक्षित न्याय मिळाला नसल्याचे मत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. विदर्भातील मुख्यमंत्री असताना पुढच्या वेळी हिवाळी अधिवेशन जास्त कालावधीचा होईल अशी अपेक्षा विकास ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. हेही वाचा Kalyan News : पेढे वाटा पेढे.! मराठी माणसांवरील हल्लेखोरांना मुख्यमंत्री कार्यालयाचे समर्थन; ‘सामना’तून महायुतीवर टीकेचा बाण