Maharashtra weather : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा; विजांपासून सावध राहण्याचे आवाहन
Maharashtra weather :

Maharashtra weather : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
११ सप्टेंबर : नाशिक घाट, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
१२ सप्टेंबर : धुळे, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी पाऊस व विजांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra weather)
१३ सप्टेंबर : पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा घाट, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
१४ सप्टेंबर : नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
यलो अलर्ट असलेल्या भागातील नागरिकांनी वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होत असताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.





