Weather Alert : महाराष्ट्रावर 72 तासांचं अवकाळी संकट; वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
Weather Alert : महाराष्ट्रात हवामानाचा दुहेरी फटका बसत आहे. सोलापूर, बीड, लातूरसह विदर्भातील जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला

Weather Alert : मार्चच्या मध्यावर उष्णतेचा तडाखा वाढल्यानंतर आता राज्यावर नव्या हवामान संकटाचे सावट निर्माण झाले आहे. पुढील 72 तासांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. Weather Alert
गेल्या आठवड्यात तापमानाने चाळिशी पार केल्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा त्रास सहन करावा लागला. मात्र आता हवामानात अचानक बदल होत असून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.Weather Alert
कोकणात उष्ण आणि दमट हवामान कायम असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर मुंबईसह उत्तर कोकणात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. Weather Alert
पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तापमानात काहीशी घट झाली असली तरी अवकाळी पावसाचा धोका वाढला आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. सोलापूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Weather alert
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड येथे हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला असून यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट आहे. येथे वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 50 किमी राहण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात मात्र उष्णता कायम राहणार असून नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत तापमान 37 ते 40 अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. Weather Alert




