Maharashtra Weather Update : कानटोप्या, स्वेटर बाहेर काढा ! राज्यभर थंडीचा कडाका आणखी जाणवणार

Maharashtra Weather Update। महाराष्ट्राच्या अनेक भागात हवामानात बदल होताना दिसत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सांगितले की, महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीची लाट सुरू आहे. देशात वाहणाऱ्या शीतलहरींचा वेग सध्या अधिक तीव्र झाला असून, त्यामुळं मध्य भारतापर्यंत गारठा अधिकाधिक वाढत आहे.
महाराष्ट्रात देखील थंडी आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यातील प्रमुख शहर परभणी, निफाज, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर इथंही थंडीचा कडाका आणखी मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. बोचऱ्या थंडीनं उत्तर महाराष्ट्र गारठलाय. ठिकठिकाणी शेकोटीच्या उबेला नागरिक बसल्याचं चित्र दिसत असून दुपारपर्यंत गारठा कायम असल्याचं दिसून येत आहे.
आकडेवारी काय सांगते, पाहा… । Maharashtra Weather Update
मुंबई – किमान 17/ कमाल 33 अंश सेल्सिअस
पुणे- किमान 12/ कमाल 30 अंश सेल्सिअस
नाशिक – किमान 11/ कमाल 029 अंश सेल्सिअस
नागपूर – किमान 14/ कमाल 29 अंश सेल्सिअस
औरंगाबाद- किमान 12/ कमाल 30 अंश सेल्सिअस
कोल्हापूर- किमान 14/ कमाल 31 अंश सेल्सिअस
महाबळेश्वर- किमान 14/ कमाल 28 अंश सेल्सिअस
परभणी- किमान 10/ कमाल 30 अंश सेल्सिअस





