Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार; किमान तापमानात मोठी घट
Weather Update : नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर महाराष्ट्रात थंडीने हळूहळू आपला जम बसवण्यास सुरुवात केली आहे.

Weather Update : राज्यातील कमाल तापमान अजूनही 33 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यामुळे सकाळी थंड वातावरण, तर दुपारी उष्णता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सकाळच्या थंडीत वाढ होऊ शकते. (Weather Update)
हवामान खात्याच्या माहितीनुसार, कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील. येथे दिवसा उष्ण आणि दमट वातावरण असेल, तर संध्याकाळनंतर आणि पहाटे हवेत गारवा निर्माण होईल. पश्चिम महाराष्ट्रात दिवसा उन्हाचा प्रभाव कायम राहील. मात्र, रात्रीच्या तापमानात घट झाल्यामुळे पहाटे चांगलीच थंडी जाणवू शकते. (Weather Update)
उत्तर महाराष्ट्रात रात्रीच्या किमान तापमानात घट अपेक्षित आहे. तापमानात मोठे बदल नसले तरी विशेषतः या भागातील ग्रामीण परिसरामध्ये थंडीचा प्रभाव जास्त जाणवेल. दुसरीकडे, मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार आहे. येथे दिवसा उन्हाची तीव्रता अधिक असली तरी रात्री आणि पहाटे गारठा वाढल्याने नागरिकांना थंडीचा अनुभव येईल. (Weather Update)
विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या दहा जिल्ह्यांमध्ये दिवसाच्या कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. (Weather Update)
मात्र रात्रीच्या तापमानातील घट कायम राहणार आहे. एकंदरीत, नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर संपूर्ण राज्यात थंडी हळूहळू आपला जम बसवत असून, रात्री आणि पहाटेच्या तापमानातील घसरणीमुळे आगामी दिवसांत थंडीचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Weather Update)
दरम्यान, धुळे येथे 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी कृषी केंद्रात 10.5 अंश, निफाडमध्ये 11.5 अंश आणि जेऊर येथे 12 अंश तापमान नोंदवण्यात आले. (Weather Update)
याशिवाय गोंदिया येथे 12.6 अंश, तर यवतमाळमध्ये 12.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. एकूणच, राज्यात थंडीची सुरुवात झाली असली तरी दुपारचे तापमान जास्त असल्याने नागरिकांना संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे. (Weather Update)





