Maharashtra Weather – राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीने पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रायगड, ठाणे, वर्धा आणि बुलढाण्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. रायगडमध्ये पुन्हा परतीच्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळाली.
सलग चार दिवसांपासून परतीच्या पावसाचा रायगडमध्ये धुमाकूळ घातला आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, इंदापूर, रोहा परिसरात पाऊस जोरदार बरसलाय. त्यामुळे नागरिकांची अक्षरक्ष: तारांबळ उडाली आहे.
कल्याण डोंबिवली परिसरामध्ये परतीच्या पावसाचे आगमन गेल्या अर्ध्या तासापासून पाऊस कोसळत आहे. मेघ गर्जना सह विजेच्या कडकटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून परिसरामध्ये काळोख पसरला आहे.
वर्ध्यात सोयाबीनचे पीक घरी घेऊन जात असताना शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर सोयाबीनसह पुरात वाहून गेलाय. वर्ध्यातील आष्टी तालुक्याच्या शिरकूटणी येथे घटना घडलीये. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील शिरकुटणी या गावातील शेतकरी पुरुषोत्तम नागदेवते याने आपल्या सोयाबीनचे पीक काढले.
ते पीक घरी घेऊन जात असताना अचानक आलेल्या पावसाने नाल्याला मोठा पूर आला. या पुरात ट्रॅक्टर सह सोयाबीनचे 40 पोते वाहून गेले आहे. सोयाबीनचे पोते पुलात पडल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
मराठवाड्यातही धुव्वाधार !
बुलढाणा जिल्यात परतीच्या पावसाने थैमान घातलय. मलकापूर शहरातील सखल भागात पुराच पाणी शिरल्याने अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
मलकापूर , दाताळा परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुऱ्हाणपूर – जालना मार्ग ठप्प गेल्या तीन तासांपासून ठप्प पडला आहे. जिल्ह्यात रात्रभर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरुच आहे.