maharashtra weather : राज्यात काही दिवसांतच गारवा ओसरणार !

maharashtra weather – या आठवड्यात तापमानाचा पारा हंगामातील सर्वात कमी 9 अंशांवर खाली आल्याने गारवा अनुभवायला मिळाला. मात्र, मंगळवारपासून थंडी ओसरणार असून दिवसाला एका अंशाने कमाल तापमानातही वाढ होणार आहे. डिसेंबर महिन्यात तापमानात कमालीचा चढउतार पाहायला मिळाला, तर या आठवड्यात उत्तरेकडील थंडीची लाट आल्याने थंडीत कमालीची वाढ झाली.
त्यामुळे तापमानाचा पारा कमालीचा घसरल्याचे पाहायला मिळाले. गेल्या चार दिवसांपासून 12 ते 14 अंश सेल्सियस दरम्यान असणारे तापमान रविवारी 9 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. एकीकडे किमान तापमानात घट होत असताना कमाल तापमानही 23 अंशांपर्यंत खाली आले आहे.
मराठवाड्यात शनिवारी कमाल तापमान 23.5 अंश होते, तर रविवारी किमान तापमान 9 अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे जिल्ह्यात कमालीची थंडी अनुभवायला मिळाली. अशीच थंडी सोमवारीही कायम राहणार आहे. त्यानंतर मात्र पुन्हा ढगाळ वातावरण तसेच हलका पाऊस होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे आबालवृद्धांसह नागरिकांनाही विविध किरकोळ आजारांना सामोरे जावे लागणार आहे.





